HW News Marathi
देश / विदेश

श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानीच अव्वल

नवी दिल्ली | फोर्ब्स मॅगझिनने श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रिज(आरआईएल)चे अध्यक्ष मुकेश अंबानी पहिल्या स्थानी आहेत. फोर्ब्स इंडियाने जाहीर केलेल्या ”इंडियाज १०० रिचेस्ट लिस्ट”मध्ये मुकेश अंबानींनी लागोपाठ अकराव्या वेळी पहिले स्थान पटकावले आहे.

मुकेश अंबानी यांच्याकडे ४७३० कोटी डॉलर(३.४० लाख कोटी)ची संपत्ती आहे. तसेच विप्रोचे अध्यक्ष अजिम प्रेमजी सदर यादीत दुस-या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २१०० कोटी डॉलर(१.५१ लाख कोटी रुपये) आहे. आर्सेलर मित्तलचे मालक लक्ष्मी मित्तल हे १८३० कोटी डॉलर(१ .३१ लाख कोटी रुपये)सह तिस-या क्रमांकावर आहेत. चौथ्या स्थानी हिंदुजा ब्रदर्सना संधी मिळाली आहे. अशोक, गोपीचंद, प्रकाश आणि श्रीचंद हिंदुजा यांची एकूण संपत्ती १८०० कोटी डॉलर(१ .२९ लाख कोटी रुपये) आहे. बांधकाम व्यावसायात दबदबा असलेल्या शापूरजी पालोनजीचे मालक पालोनजी मिस्त्री या यादीत पाचव्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती १५७० कोटी डॉलर(११ .३ लाख कोटी रुपये) आहे.

देशातली सर्वात मोठी आयटी कंपनी एचसीएल टेकचे संस्थापक शिव नादर १४६० कोटी डॉलर (१० .५ लाख कोटी रुपये)च्या संपत्तीसह सहाव्या स्थानी आहेत. तर सातव्या स्थानावर गोदरेज समूह आहे. गोदरेज समूहाची एकूण संपत्ती १४०० कोटी डॉलर(१० लाख कोटी रुपये) आहे. सन फार्माचे मालक दिलीप सांघवी या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १२६० कोटी डॉलर(९० ,७३५ कोटी रुपये) आहे. इंडियाज १०० रिचेस्ट लिस्टमध्ये नवव्या स्थानी कुमार मंगलम बिर्ला आहेत. त्यांची एकूण संपत्ती १२५० कोटी डॉलर(जवळपास ९०००० कोटी रुपये)च्या जवळपास आहे. यादीत दहाव्या स्थानी गौतम अडानी आहेत, त्यांनी एकूण संपत्ती ११९० कोटी डॉलर(८५ ,६८२ कोटी रुपये) आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चित्रपटगृहात राष्ट्रगीताची सक्ती नाही- सुप्रिम कोर्ट

News Desk

‘अमित शाह संसदेत आले, तर मी टक्कल करेन’, देरेक ओब्रायनचं अमित शहांना आवाहन

News Desk

शरयू नदीच्या तिरी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती

Aprna