नवी दिल्ली | पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि माकप असे मिळून जवळपास १०७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भाजपचे नेते मुकुल रॉय यांनी केला आहे. राय यांनी हा दावा कोलकातामधील प्रसार माध्यमांशी बोलताना केला होता. यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोठा धक्का बसणार असल्याची सांगितले जात आहे.
Mukul Roy, BJP in Kolkata: 107 West Bengal MLAs from CPM, Congress and TMC will join BJP. We have their list prepared and they are in contact with us pic.twitter.com/SJ48v5WHMW
— ANI (@ANI) July 13, 2019
ममता आणि भाजप मधील संघर्ष आता संपूर्ण देशाला माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता मिळल्यानंतर बंगालमध्ये अनेकदा भाजप तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, बॉम्ब हल्ले देखली झाले. यामुळे बंगालमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.