HW News Marathi
देश / विदेश

जेट एअरवेजचे माजी सीईओ नरेश गोयल यांच्या घरावरील छाप्यानंतर ईडीने घेतले ताब्यात

मुंबई | जेट एरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गोयल यांच्या मुंबईतील निवासस्थानी काल (४ मार्च) रात्री उशिरा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. गोयल यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ईडीने गोयल यांना समन्स पाठविला होता. गोयलांनी कर वाचवण्यासाठी देशातील आणि परदेशातील कपंन्यांशी पैशाची देवाण-घेवाण केली होती.

जेट एअरवेज आणि गोयल यांची ‘फेमा’अंतर्गत चौकशी सुरू आहे आणि त्यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा ईडीचा विचार आहे. जेटच्या १२ वर्षांपासूनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी ईडीकडून सुरू आहे. ईडीने आतापर्यंत गोयल यांनी अनेकवेळा चौकशी केली आहे.

यापूर्वी गोयल आणि त्यांची पत्नी अनिता यांच्यावर नुकतीच एका ट्रॅव्हल कंपनीत ४६ कोटी रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोलय यांच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी)नुसार विविध कलमांतर्गत त्यांच्या गुन्हा दाखल केला आहे. आता दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट भागात असलेल्या कार्यालयात अकबर ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मुख्य वित्त अधिकारी राजेंद्रन नेरुपरंबिल यांनी तक्रार दिली होती.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आजच्या अर्थसंकल्पात आत्मनिर्भरतेचे दर्शन”, बजेटनंतर पंतप्रधानांनी दिली प्रतिक्रिया

News Desk

देशात दरवर्षी २६ डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’ साजरा होणार; पंतप्रधानांची घोषणा

News Desk

मोदी सरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, म्हणाले एकाग्रतेकडे लक्ष द्या

swarit