HW News Marathi
देश / विदेश

पद्म भूषण पुरस्काराने गौरविले सुंदर पिचाई अडचणीत का आले?

मुंबई | मुंबई पोलिसांकडून गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासह पाच जणांवर कॉपीराईट कलमा अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पिचाई यांच्याविरोधात बॉलिवूड दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या अंधेरी पश्चिमेतील एमआयडीसी आदेशानंतर एमआयडीसी पोलिसांनी पिचाईसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सुनील दर्शन यांनी दिग्दर्शक केलेल्या ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ हा सिनेमा युट्यूबवर अपलोड केला आहे. या सिनेमाचे गुगलने कोणतेही हक्क न घेता सिनेमा युट्यूबवर अपलोड करण्याची परवानगी दिल्याचा आरोप सुनील दर्शन यांनी केला आहे. यामुळे आता पिचाईंने कॉपीराईट कलमाचे उल्लंघन झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

दरम्यान, सुनील दर्शन यांनी न्यायालयात कॉपीराईट कलमाचे उल्लंघन केल्याचा दावा त्यांनी केला होता. यानंतर एमआयडीसी पोलिसांनी कॉपीराईट कलम१९५७च्या अंतर्गत ५१, ६३ आणि ६९ एफआयआर दाखल करण्यात आली. यासंदर्भात सुनील दर्शन यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले, “माझा सिनेमा मी युट्यूबवर अपलोड केलेला नसून देखील हा सिनेमा युट्यूबला विकाला नाही. आणि आता सिनेमाला कोट्यावधीमध्ये व्ह्यूज आहेत. मी युट्यूबला वेळोवेळी सांगतो की, तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मवरून सिनेमा हटविण्याची विनंती केली. परंतु युट्यूबने माझ्या विनंतीला दुर्लक्ष केले आहे. यानंतर न्यायालयात धाव घेल्याचे ते म्हटले.”  

पिचाईंना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजे २५ जानेवारीला केंद्र सरकारकडून सुंदर पिचाई यांना पद्म पुरस्काराने घोषणा केली. यात सरकारने १२८ जणांना त्यांच्या कामगिरीबद्दल पुरस्कार जाहीर केले आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. चार लोकांना पद्म विभूषण, तिघांना मरणोपरांत पद्म विभूषण पुरस्कार देऊन पुरस्कार दिला आहे. तर १७ जणांना पद्म भूषण आणि १०७ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरवित केले आहे. 

      

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकचा जवान केशव गोसावी यांना काश्मीरमध्ये वीरमरण

News Desk

लादेनला मारले जाते तर काहीही शक्य आहे, जेटलींचे अत्यंत मोठे विधान

News Desk

इंधन दरवाढीने मला काही फरक पडत नाही | रामदास आठवले

swarit