HW News Marathi
देश / विदेश

हॉर्न वाजवायच्या मुंबईकरांच्या हौशेला मुंबई पोलिस देणार ‘पनिशिंग सिग्नलची’ शिक्षा….काय आहे ही शिक्षा?

मुंबई । मुंबई शहरामध्ये तुमच्यामधल्या ज्या कोणीही प्रवास केला असेल त्याला वाहतुकीची परिस्थीती आणि हॉर्नमुळे होणार्‍या तीव्र ध्वनिप्रदूषणाची कल्पना आहेच. मुंबई म्हणजे स्वप्ननगरी आणि मायानगरी असली तरी ट्राफिक च्या समस्येने या शहरातला प्रत्येक माणूस त्रस्त आहे .

मात्र या ट्रॅफिक मध्ये नको तितक्या वेळा हॉर्न वाजवून प्रदूषणात भर पडणाऱ्या प्रवाशांना धडा शिकवण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘पनीशिंग सिग्नल’ म्हणजेच शिक्षा देणारा सिग्नल आणला आहे. कारण प्रश्न साधा , सोपा आणि सरळ आहे , जास्ती वेळा हॉर्न वाजवला म्हणून काय सिग्नल तितक्याच लवकर हिरवा होतो काय ?

ट्वीटरवरुन मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध केलेला एक छोटासा व्हिडिओ आता याच प्रश्नाचं उत्तर देतोय. या व्हिडिओमध्ये ध्वनीप्रदूषणावर आळा घालण्यासाठी पोलिस काही सिग्नलच्या खांबावर डेसिबल मीटर बसविताना दिसत आहेत. हॉर्न वाजायला लागल्या नंतर डेसिबलची पातळी 85 डीबीच्या पुढे गेल्यास संपत आलेला सिग्नल पुन्हा हिरव्याच्याऐवजी लाल होतो आणि रीसेट होऊन पूर्वपदावर येतो. म्हणजे 10 सेकंद झालेला सिग्नल पुन्हा 90 सेकंदांचा होतो. त्यामुळे आता इथून पुढे सिग्ननाला उभे राहिलात कि हॉर्न वाजवायचा कि नाही याचा 100 वेळा विचार करावा लागणार आहे .

या शॉर्ट क्लिपमध्ये मुंबई ट्राफिक पोलिस सीएसएमटी, वांद्रे, पेद्दार रोड, हिंदमाता यासारख्या काही ठिकाणी डेसिबल मीटर बसवताना दिसतात आणि दुसर्‍या दिवशी मीटर 85 डीबीपर्यंत पोहोचल्यानंतर सिग्नल आपोआप 90 सेकंदात रिसेट होतो.

“होंक मोर, वेट मोर ” म्हणजे हॉर्न जितका जास्ती वाजवालं तितका जास्ती वेळ थांबा असा मेसेज डीजिटल बोर्डवर प्रदर्शित होतो तेव्हा प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसतो.

थोडक्यात काय तर मुंबईची वाढती लोकसंख्या यामुळे प्रदूषणाचा विळखा मुंबईला बसला आहे. परंतु मुंबई पोलीस आता ध्वनिप्रदूषणावर अशा प्रकारच्या क्लुप्त्या राबवत आहेत. यामुळे प्रदूषण कमी व्हायला मदत होणार कि लोक त्रस्त होऊनअधिक हॉर्न वाजवणार हे पाहणं महत्वाचं आहे. तोवर तुम्ही पहा मुंबई पोलिसाचा हा अनोखा विडिओ ..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बसला अपघात, आयटीबीपीच्या एका जवानाचा मृत्यू

News Desk

दाभोळकर हत्या प्रकरण | दुसऱ्या राज्याच्या तपासावर अवलंबून का राहता ?

News Desk

पाकिस्तानने धर्मनिरपेक्ष व्हावे !

News Desk