HW News Marathi
क्रीडा

माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान

मुंबई | भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला सौरव गांगुली बीसीसीआयचा ३९वा अध्यक्ष बनला आहे. सौरव गांगुलीने आज (२३ ऑक्टोबर) अखेर बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळणारा गांगुली हा फक्त दुसरा कर्णधार अध्यक्ष पदी विराजमान झाला आहे. बीसीसीआचा अध्यक्ष म्हणून आज दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. त्याने अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रशासकीय समितीचे ३३ महिन्यांचे शासन संपुष्टात येईल. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीची निवड एकमताने झाली.

सौरव गांगुली बीसीसीआचा नवे अध्यक्ष तरकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह बीसीसीआयचे सचिव असतील. उत्तराखंडचे महिम वर्मा नवे उपाध्यक्ष, केंद्री अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे धाकटे बंधू अरुण धूमल खजिनदार आणि केरळचे जयेश जॉर्ज संयुक्त सचिव म्हणून पदभार स्वीकारतील. गांगुलीने पदाभार स्वकारल्यानंतर यापुढे त्याची नवी टीमच बीसीसीआयसाठी निर्णय घेईल.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (१४ ऑक्टोबर) गांगुली यांनी अर्ज भरला. या वेळी एन. श्रीनिवासन, राजीव शुक्ला व निरंजन शहा हे दिग्गज क्रिकेट प्रशासकही उपस्थित होते. गांगुलीशिवाय इतर कोणीही अध्यक्षपदासाठी अर्ज न भरल्याने गांगुली यांच्या अध्यक्षपदाच्या घोषणेची औपचारिकता उरली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन  

News Desk

वेस्ट इंडिजला पुन्हा झटका

swarit

India vs Pakistan | भारताचे हे शिलेदार करणार पाकिस्तानचा सामना

News Desk