HW News Marathi
Covid-19

मुस्लीम समाजातील लोक कोरोना लस घेण्यास टाळाटाळ करतात, माजी मुख्यमंत्र्यांचं मत

नवी दिल्ली | देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर तीन लाख लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी एक विधान केलं आहे. मुस्लीम समाजातील लोक कोरोना लसीकरण करुन घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं परखड मत व्यक्त केलं आहे. तसेच लसीकरणासंदर्भात मुस्लीम समाजामध्ये अनेक गैरसमज असल्याचं देखील रावत यांनी म्हटलं आहे.

त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना हे मत व्यक्त केलं आहे. जागतिक रक्तदान दिनानिमित्त ऋषिकेश येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रावत यांनी आपलं परखड मत मांडलं. “मी मुद्दाम नाव घेतोय पण आपल्या देशातील मुस्लीम समाजातील लोक सध्या लसीकरणापासून दूर राहत आहेत. त्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे. ते अजूनही घाबरत आहेत आणि त्यांच्यामध्ये लसीकरणासंदर्भात अनेक गैरसमज आहेत” असं रावत यांनी म्हटलं आहे.

रावत यांनी यावेळी सामाजिक संस्थांनी आणि सोशल मीडियाने मुस्लीम समाजामध्ये जनजागृती करुन लसीकरण हे धोकादायक नसल्याचा संदेश देण्यात मदत करावी असं आवाहनही केलं आहे. “तुम्ही लस घेतली नाही तर हा विषाणू नष्ट होणार नाही. लस न घेतल्यास या विषाणूचा संसर्ग होऊन एखादी व्यक्ती सुपर स्प्रेडर ठरू शकते. सर्वांनी लसीकरण करुन घेण्यासाठी पुढे यावं असं मी आवाहन करतो. देशातील 80 टक्के लोकांचं लसीकरण झाल्यानंतरच हर्ड इम्युनिटी निर्माण होईल” असं देखील रावत यांनी म्हटलं आहे. एक हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

5 नवे कोव्हिड सेंटर, 70 टक्के ऑक्सिजनयुक्त बेड, तिसऱ्या लाटेसाठी मुंबई पालिका सज्ज

News Desk

केंद्र आणि राज्य सरकारांनी जागे व्हावे ! सोनिया गांधींचा सल्ला

News Desk

३ तारखेनंतर मोकळीक देताना सावध राहण्याची गरज !

News Desk