HW News Marathi
Covid-19

कोरोना संकट चिंताजनक! पंतप्रधान मोदींनी ११ वाजता बोलावली मंत्रिमंडळाची बैठक

नवी दिल्ली | देशातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रुग्णावाढीबरोबर मृतांचा आकडाही वेगाने वाढत असून, अनेक ठिकाणी स्मशानभूमीच्या बाहेर पार्थिवांच्या लांबच लांब रांगा लागताना दिसत आहे. रोज बेड, ऑक्सिजन आणि औषधांची कमतरता जाणवत असुन चिंता अधिक वाढत आहे. देशातील परिस्थितीवरून सर्वोच्च न्यायालयाने देखील केंद्राला फटकारलं असून, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (३० एप्रिल) एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडून मदतीसाठीचे हात मिळत असून, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर अभावी दररोज अनेक रुग्णांचे प्राण जात आहे. देशातील परिस्थितीची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोरोनासंदर्भातील राष्ट्रीय धोरणाबद्दलही केंद्राकडे विचारणा केली होती. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ वाजता ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

या बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांसह स्वतंत्र पदभार असलेले आणि राज्यमंत्रीही सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत विविध राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. रुग्णालयातील उपलब्ध बेड, ऑक्सिजनची स्थिती, लसीकरणाची प्रगती आणि औषधींचा साठा या मुद्द्यावर चर्चा केली जाणार असल्याचं वृत्त आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची लक्षणे नसल्यास किंवा सौम्य लक्षणे असल्यास आता घरीच विलगीकरण करता येणार, जाणून घ्या नियम

News Desk

मुख्यमंत्र्यांनी ‘मराठा समाजासोबत आहोत’ हा विश्वास द्यावा !

News Desk

साताऱ्यानं राज्याचं टेन्शन वाढवलं, कोरोना पॉझिटिव्हीटी रेटमध्ये अग्रेसर

News Desk