नवी दिल्ली | बिहारच्या राजकारणातील वजनदार नेते आणि लोक जनशक्ती पार्टीचे माजी अध्यक्ष राम विलास पासवान यांचे काल (८ ऑक्टोबर) रात्री निधन झाले. राम विलास पासवान यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर पंतप्रधान मोदींनी टि्वटच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे दरम्यान, बिहार विधानसभा निवडणूकीच्या आधीच ही अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे.
“मला आज प्रचंड दु:ख झाले आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. आपल्या देशात आज पोकळी निर्माण झाली आहे. कदाचित ती कधी भरुन निघणार नाही. राम विलास पासवान यांचे निधन हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. मी माझा मित्र, मौल्यवान सहकारी गमावला. प्रत्येक गरीब माणसाला सन्मानाने जगता आले पाहिजे, ही कळकळ त्यांच्या ठायी होती” असे पंतप्रधान मोदींनी आपल्या टि्वट केले आहे.
I am saddened beyond words. There is a void in our nation that will perhaps never be filled. Shri Ram Vilas Paswan Ji’s demise is a personal loss. I have lost a friend, valued colleague and someone who was extremely passionate to ensure every poor person leads a life of dignity. pic.twitter.com/2UUuPBjBrj
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.