नवी दिल्ली | वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन संसदेबाहेर उफाळलेल्या संघर्षाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भाष्य केले आहे. अमेरिकेत उसळलेला हा हिंसाचार बघून अतीव दु:ख होत आहे. कायद्याप्रमाणे आणि शांततेत सत्तेचे हस्तांतरण झाले पाहिजे. बेकायदेशीर आंदोलने करुन लोकशाही प्रक्रियेत अडथळे आणणे कदापि योग्य नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्षपदावरून पायउतार होण्यास नकार देत असल्यामुळे हा सारा प्रकार घडला आहे. अमेरिकन संसदेत गुरुवारी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज आणि सिनेटचे संयुक्त अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनात निवडणूक प्रक्रियेत जो बायडेन यांच्या विजयावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले जाणार होते.
Distressed to see news about rioting and violence in Washington DC. Orderly and peaceful transfer of power must continue. The democratic process cannot be allowed to be subverted through unlawful protests.
— Narendra Modi (@narendramodi) January 7, 2021
मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण हार मानण्यास तयार नसल्याचे सांगत आपल्या समर्थकांना काल (६ जानेवारी) दुपारी वॉशिंग्टनमध्ये जमण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर वॉशिंग्टनमध्ये हिंसाचार सुरु झाला. ट्रम्प यांच्या काही समर्थकांनी तारेचे कुंपण तोडून अमेरिकन संसदेतही शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रम्प समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. यावेळी दंगल नियंत्रण पथकाच्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या वॉशिंग्टनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.