HW News Marathi
देश / विदेश

बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात मलाही अटक झाली होती – नरेंद्र मोदी

ढाका | बांगलादेशाच्या स्वातंत्र्य दिनाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशाच्या दौऱ्यावर आले आहेत. कोरोना काळातील त्यांचा हा पहिलाच दौरा असून त्यांनी बांगलादेशच्या दौऱ्यात मोठं विधान केलं आहे.

ढाका येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं विधान केलं. बांगालदेशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो. माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होतं. त्यावेळी मी २०-२२ वर्षाचा असेल. त्यावेळी माझ्यासह माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मीही तुरुंगात गेलो होतो, असं मोदी म्हणाले.

बांगलादेश आणि भारताचे संबंध दृढ

बांगलादेश आणि भारतातील संबंध आणखीन दृढ होतील. येथील नागरिकांचे मन आणि विश्वास दोन्ही भारताने जिंकले आहे. बांगलादेशला २० लाख कोरोना लसींचा पुरवठा करण्यात आला. या कठीण प्रसंगात बांगलादेशप्रमाणे अनेक देशांच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा राहिला. यापुढेही बांगलादेशला कोरोना लसीचा पुरवठा केला जाईल, असे मोदी यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

स्टार्स आणि राजकारण्यांना भेटले

यावेळी मोदींनी बांगलादेशचे राजकारणी आणि कलाकारांचीही भेट घेतली. बांगलादेशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही ते भेटले. शिवाय बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकिब अल हसन यालाही मोदी भेटले. शिवाय येथील भारतीयांना भेटतानाच वोहरा समुदायाच्या लोकांचीही त्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी गुजरातीत संवाद साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममतांना मोठा धक्का, राजीव कुमार यांना सीबीआयला सहकार्य करण्याचे निर्देश

News Desk

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी घटना; 6 जणांचा मृत्यू

Aprna

अमेरिकेच्या विमानतळावर पाक पंतप्रधानांचे उतरवले कपडे

News Desk