HW News Marathi
देश / विदेश

कॉंग्रेसच्या मानसिकतेवर टीका करत मोदींनी लोकसभेत सांगितला एक किस्सा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आज (१० फेब्रुवारी) चोहोबाजूनं टिका केली आहे. काँग्रेसच्या मानसिकतेवर आणि आहे तशीच स्थिती ठेवण्याच्या मानसिकतेवर टीका करताना मोदींनी तामिळनाडूमधील एक किस्सा लोकसभेत सांगितला. आम्ही बदल घडवण्यासाठी आलो आहोत आणि त्यासाठी प्रयत्न करणारच. साचलेलं पाणी रोगराई आणतं आणि वाहतं पाणी जीवन फुलवतं असं सांगायलाही मोदी विसरले नाहीत.

“कृषी कायद्यांमध्ये काही कमतरता असेल तर बदल करण्यात काही समस्या नाही. त्यांनी काही नेमकी गोष्ट सांगितली तर बदल करण्यात कोणताही संकोच नाही. कायदे लागू केल्यानंतर देशात कोणतीही मंडी, एमएसपी बंद झालेलं नाही. हे सत्य असून हे लपवून चर्चा करणं योग्य नाही. कायदा झाल्यानंतर खरेदीतही वाढ झाली आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगताच विरोधकांनी जोरदार गदारोळ केला.

मोदींनी काय सांगितला किस्सा?

तामिळनाडूत ६०च्या दशकात राज्य कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यावर विचार करण्यासाठी एक कमिशन बसवलेलं होतं. त्या कमिशनच्या चेअरमनकडे एक लिफाफा (पत्र) आला. त्यावर टॉप सिक्रेट असं लिहिलं होतं. त्यात एक अर्ज होता. अर्ज करणाऱ्याने मागणी केली होती की, माझा पगार वाढवला जावा. मी खूप वर्षापासून काम करतोय. इमानदारीने काम करतोय. चेअरमनने त्या अर्जदाराला उत्तर लिहिलं की, तुम्ही कोण आहात? काय करता? अर्जदारानं उत्तर पाठवलं, मी सीसीएच्या पदावर काम करतो. मुख्य सचिवांच्या बाजूला बसतो. उत्तर वाचून चेअरमनला आश्चर्य वाटलं. त्यानं पुन्हा विचारलं, हे सीसीए नेमकं काय आहे? आम्हाला तर काहीच माहीत नाही.

अर्जदारानं पुन्हा पत्र लिहून सांगितलं की, मी १९७५ पर्यंत हे मी सांगू शकत नाही. मग चेअरमननं सांगितलं, मग तू माझं डोकं कशाला खातोयस, जे कमिशन १९७५ नंतर येईल, त्यांच्याकडे पगारवाढीची मागणी कर. अर्जदाराला वाटलं, हे तर बिघडलं सगळं. त्यानं चेअरमनला पुन्हा उत्तर लिहिलं आणि सांगितलं सीसीएचा अर्थ आहे, चर्चिल्स सिगार असिस्टंट. हे माझं पद आहे आणि या पदावर मी काम करतो. 1940 मध्ये विन्स्टन चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान झाले आणि त्यांना त्रिचीहुन सिगारेट जात होती. सीसीएचं काम होतं की, ती सिगारेट पोहोचली की नाही ते पाहाणं. 1945 मध्ये चर्चिल निवडणूक हरले. पण ते पद तसच राहीलं. सिगारेटचा सप्लायही कायम राहीला. देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतरही ते पद कायम राहीलं. त्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने स्वत:च्या पगारवाढीची मागणी केली होती. जर आहे ती स्थिती बदलली नाही तर काय सुरु असतं त्याचं हे उदाहरण.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंनी काढली रिया चक्रवर्तीची लायकी !

News Desk

आता फक्त १५३ रुपयात पाहा टीव्ही चॅनेल्स

News Desk

“…मग नवाब मलिक तुम्हीही मंत्रिपदाचा राजीनामा द्या”, दरेकरांचं आव्हान

News Desk