पुणे | देशात कोरोना रुग्णांच्या संख्या आकडा ६७ हजार १५२ वर गेली आहे. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत २२०६ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूविरुद्ध लढ्यासाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने अँटीबॉडी तपासण्याचे किट विकसित केले आहे. यामुळे भारतात प्रथमच स्वदेशी बनावटीचे अँटीबॉडी टेस्ट किटचे संशोधन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे.
National Institute of Virology, Pune has successfully developed the 1st indigenous anti-SARS-CoV-2 human IgG ELISA test kit for antibody detection of #COVID19. It will play a critical role in surveillance of proportion of population exposed to the infection: Union Health Minister pic.twitter.com/Tno7EIRsFU
— ANI (@ANI) May 10, 2020
देशात विकसित केलेल्या या टेस्टिंग किटला ‘कोविड कवच एलिसा टेस्ट’ असे नाव देण्यात आले आहे. या अँटीबॉडी टेस्ट किटमुळे ज्या भागात लोकसंख्या जास्त किंवा दाटीवाटीची वस्ती आहे. या किटने कोरोनाचा संसर्ग झाला आहे का ?, हे तपासण्यास महत्वाची भूमिका पार पाडल्याची आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले.
अँटीबॉडी टेस्ट किटमध्येय अडीच तासांमध्ये ९० चाचण्या घेण्याची क्षमता आहे. येत्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यात व्यक्त केली जात आहे. यावेळी हे कीट महत्वाची भूमिका बजावले. तर या किटद्वारे एखाद्याच्या रक्तात किती रोगप्रतिकारक शक्ती आहे याची माहिती मिळणार आहे. मुंबई दोन ठिकाणी या किटच्या टेस्टची परवानगी देण्यात आली होती. त्याचे परिणाम अतिशय उत्तम आलेत. एक महिन्यापेक्षा कमी कालावधीत ही किट तयार केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.