नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटविणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झाला आहे. हे विधेयक आज (६ ऑगस्ट) शहांनी लोकसभेत मांडले. अखेर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी २४ तासानंतर जम्मू-काश्मीरमधील ३७० हटवण्याच्या सरकारच्या निर्णायवर मौन सोडले असून राहुल यांनी सरकारचा हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्याविरोधात असल्याचे सांगत राहुल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राहुल यांनी काश्मीर निर्णयावर ट्विट निषेध केला आहे.
National integration isn’t furthered by unilaterally tearing apart J&K, imprisoning elected representatives and violating our Constitution. This nation is made by its people, not plots of land.
This abuse of executive power has grave implications for our national security.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 6, 2019
राहुल गांधी यांनी ट्विट म्हटले की, “जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना डांबून ठेवून सुरक्षेचे उल्लंघन करणारा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेचे उल्लंघन करणार आहे. राहुल पुढे असे देखील म्हणाले की, “देश हा नागरिकांमुळे बनतो. जमिनीच्या एका तुकड्याने देश होत नाही,” अशी टीका केली आहे.
शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीर कलम ३७० हटविणे आणि विभाजन प्रस्ताव काल (५ ऑगस्ट) मांडले. राज्यसभेत हे विधेयक १२५ मतांच्या जोरावर सभागृहात मंजूर करण्यात आले. तर काँग्रेसने या विधेयकाचा विरोध केला. राज्यसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी लोकशाहीच्या इतिहासातील हा काळा दिवस असल्याचे म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.