नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येते. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वीच १० जून रोजी सिद्धू यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून त्याचा आज खुलासा केला आहे. सिद्धूंनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
My letter to the Congress President Shri. Rahul Gandhi Ji, submitted on 10 June 2019. pic.twitter.com/WS3yYwmnPl
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) July 14, 2019
पंजाबमध्ये सत्ता असूनही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्याचं खापर सिद्धूंवर फोडून त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली होती.त्यानंतर ६ जून रोजी झालेल्या पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत अमरिंदर सिंग यांनी सिद्धूसह अनेक मंत्र्यांचे खातेही बदलले होते. सिद्धूंकडे नागरी प्रशासन विभाग होता. त्यांच्याकडे ऊर्जा खात्याचा भार सोपविण्यात आला होता. त्यांनी याच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
Will be sending my resignation to the Chief Minister, Punjab.
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) July 14, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.