HW Marathi
देश / विदेश

छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षलवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद

दंतेवाडा | छत्तीसगड मधील दंतेवाडी  दिवाळीच्या दिवसातच नक्षलवाद्यांनी  मोठा  हल्ला केला आहे. या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी बचेली येथे भूसुरुंग स्फोट घडवून सीआयएसएफच्या बसला उडवले. या हल्ल्यात अन्य चार स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला असून एक जवान शहीद झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा हल्ला  दंतेवाड्यातील बचेली पोलीस स्टेशनच्या हद्दीत आयईडी स्फोट झाल्याची माहिती मिळली आहे. यामध्ये सीआयएसएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यामध्ये अनेकजण जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

छत्तीसगड मधील दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात काही दिवसांपूर्वी  पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातील दोन जवान शहीद झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात दूरदर्शन या वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनला गोळी लागून त्याचा मृत्यू झालाची घटना घडली होती. दंतेवाडा येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  बहिष्कार घालण्यासाठी नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Related posts

शशिकला यांना व्हीआयपी ट्रिटमेंट, प्रकरण उजेडात आणणा-या अधिका-याचीच बदली

News Desk

#AeroIndia2019 : ‘एरोइंडिया’च्या शो दरम्यान कार पार्किंगला भीषण आग

News Desk

अखेर रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर

News Desk