HW News Marathi
देश / विदेश

एनडीटीव्हीचे प्रमोटर प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्यावर सेबीची मोठी कारवाई

नवी दिल्ली | सिक्यॉरिटीज ऐंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने एनडीटीव्हीचे डायरेक्टर प्रणय रॉय आणि त्यांची राधिका रॉय यादोघांव्यतिरिक्त याच चॅनेलमधील अजून प्रमोटर आरआरपीआर होल्डिंग्सचे म्यूचुअल फंडचे सर्व गुंतवणुकीवर २ वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर हो दोघेही एका वर्षपर्यंत कोणत्याही लिस्टेड कंपनीमधील बॉर्ड पदावर किंवा मॅनेजेरियल पदावर विराजमान राहू शकत नाही. या दोघांनी १९८८ साली एनडीटीव्हीची स्थापना केली होती. रॉय यांनी सेबीने दिलेल्या आदेशाविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याची प्रतिक्रिया एनडीटीवीच्या वेबसाइटवर दिली आहे.

प्रणय रॉय आणि त्यांची राधिका रॉय या दोघांवर मॅनेजरियल पोजिशन घेण्यावर बंदी लावली आहे. दरम्यानसेबीने दोघेही सिक्यॉरिटी मार्केटपासून दूर ठेवण्याचे आदेश दिले आहे. कारण या दोघांनी आयसीआयसीआय बँक आणि विश्वप्रधान कमिर्शयल प्रा. लि. (वीसीपीएल)सोबत लोन अॅग्रीमेंटच्या महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या नसल्यामुळे सेबीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रणय रॉय आणि राधिका रॉय दोघांनी एनडीटीवी डायरेक्टर्स पद सोडून देणे आणि त्यासोबतच मॅनेजमेंटसारख्या पदावर विराजमान होण्यास सेबीकडून सक्त मनाई करण्यता आली आहे. यावर दोघांनी एनडीटीव्हीच्या वेबसाइला प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी म्हटले की, ” सेबीने आमच्यावर कारवाई करण्याचे दिलेले आदेश हे चुकीचे आहे. सेबीच्या निर्णयावर आम्ही कायदेशीर पावले उचलणार असल्याचे रॉय म्हणाले.”

सेबीला २०१७ मध्ये एनडीटीव्हीचे एक शेअरधारक क्वांटम सिक्यॉरिटीजद्वारे तक्रार मिळाली होती. यानुसार प्रमोटरर्स लोन अग्रीमेंटची सर्व माहितीचा खुलासा न करण्याचे उल्लंघन केले आहे. सेबीने तक्रारीवर २००८ सालच्या नोव्हेंबर २०१७च्या दौरान एनडीटीवीच्या घडामोडींची चौकाशी करण्यात आली होती. यानंतर दोघांवर आरआरपीआर होल्डिंग्स एनडीटीवीचे प्रमोटर होते. त्यानंतर २००९मध्ये या प्रमोटरने एनडीटीवीचे ६३.१७ प्रति शेअर होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केरळच्या मदतीला विठुराया धावून आला

swarit

सुरक्षा दल-नक्षलवाद्यांमधील चकमकीत ७ नक्षली ठार

News Desk

प्राध्यापकांना मिळणार २२ महिन्यांचा पगार, २२हजार कोटींचा केंद्रावर बोजा

News Desk