काठमांडू | नेपाळच्या पर्यटन आणि नगर विमान मंत्री रबींद्र अधिकारी यांच्यासह पाच इतर लोकांना घेऊन जाणारे विमान आज (२७ फेब्रुवारी) कोसळले आहे. या विमान दुर्घटनेत सर्व सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. नेपाळच्या पूर्वेकडच्या डोंगराळ भागात विमान दुर्घटनाग्रस्त असून विमान बेपत्ता झाल्याची माहिती पहिल्यांदा मिळाली होती. यानंतर ताप्लेजुंग जिल्ह्यातील डोंगरात पोलिसांना एका ठिकाणी मोठी आग लागल्याचे चित्र दिसून आले. तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेली असून या ठिकाणांची पाहणी केल्यानंतर विमानाचा अपघात झाल्याची अधिकृत माहिती मिळाली.
Nepal: The Civil Aviation Authority has confirmed that all 6 on board including the tourism minister are dead in a chopper crash https://t.co/7Sc9vsfhfS
— ANI (@ANI) February 27, 2019
हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या दुर्घटनेत ३९ वर्षीय अधिकारी यांच्याशिवाय उद्योगपती आंग त्सरिंग शेरपा आणि पंतप्रधान केपी शर्मा यांचे खासगी स्वीय सचिव युवराज दहल, पर्यटन मंत्रालयाचे दोन ऑफिसर आणि मंत्र्यांच्या एका अंगरक्षकाचा मृत्यू झाला आहे. पूर्व नेपाळमधल्या पर्वतीय भाता ताप्लेजुंग जिल्ह्यातील एका डोंगरात हे विमान अपघातग्रस्त झाले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.