HW News Marathi
देश / विदेश

नेटीझन्सकडून भारतीय वायू सेनेचे अभिनंदन, सोशल मीडियावर ‘Air Strike’ ट्रेंडिंग

मुंबई । पुलवामा हल्लाच्या अवघ्या १२ दिवसांत भारतीय वायू सेनेकडून पाकिस्तानवर Air Strike करून बदला घेण्यात आला आहे. या हल्ल्यात जवळपास १००० किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यात अनेक दहशवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली येत आहे. पाकिस्तानवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन प्रचंड कौतुक होत आहे. भारतीय सैन्याचे आभार मानण्यात येत आहेत. तसेच #Balakot, #IndiaStrikesBack, #Josh, #AirStrike, #IndianAirForce #SurgicalStrike2 हे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.

भारताने मिराज फायटर जेटच्या सहाय्याने पाकिस्तानमध्ये हा हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी (२६ नोव्हेंबर) पहाटे ३.३० च्या सुमारास हा हवाई हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केले आहे. या हल्ल्यात पाकिस्तानच्या बालाकोट येथील बहुतांशी दहशवादी तळ उध्वस्त करण्यात आले आहेत.

भारताने पाकिस्तानवर केलेल्या या हल्ल्याची माहिती खुद्द पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. तसेच पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पळवून लावल्याचा खोटा दावाही केला आहे. मात्र, हा दावा करताना त्यांच्याकडून भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. सध्या, सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. तसेच या हल्ल्याची बातमी येताच ट्विटरवर Air Strike नावाचा ट्रेंड सुरू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दरमाह तब्बल चार लाखांची पोटगी देण्याचे आदेश

News Desk

देवेंद्र फडणवीसांना पक्षाकडून मोठी जबाबदारी ! केंद्रीय नेतृत्त्व लवकरच करणार घोषणा

News Desk

पेगासस प्रकरण : राहुल गांधींचा मोदींवर निशाणा; तर भाजपच्या नेत्यांवरही पाळत असल्याचा राऊतांचा दावा

News Desk