HW News Marathi
देश / विदेश

नारायण राणेंना तातडीने दिल्लीला बोलावणं, केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान निश्चित?

नवी दिल्ली |भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांना तातडीने काल (५ जुलै)दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या कार्यालयातून राणेंना फोन करण्यात आला होता. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना स्थान मिळणं जवळपास निश्चित मानलं जात आहे.

राणे-नड्डा यांची भेट होणार

उद्या ( 7 जुलै) केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील 17 ते 20 राज्यसभा आणि लोकसभा खासदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचं नाव केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुरुवातीपासूनच चर्चेत होतं. दिल्लीत राणेंची जे पी नड्डा यांच्याशी भेट झाल्यानंतर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

राणे काय म्हणाले?

दरम्यान, भाजप नेते नारायण राणे यांनी काल सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी त्यावर हसून प्रतिक्रिया दिली. असं काही घडत असेल तर मी आभार मानतो. तुमच्या तोंडात साखर पडो. अधिकृत पत्रं येत नाही आणि जोपर्यंत शपथ घेत नाही, तोपर्यंत जरा धीर धरा, असं राणे यांनी हसत सांगितलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेसबुक ओळखणार तुमचे नैराश्य!

News Desk

देशात दरवर्षी २६ डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’ साजरा होणार; पंतप्रधानांची घोषणा

News Desk

अखेर धर्म संसदेने निश्चित केली राम मंदिर निर्माणाची तारीख

News Desk