HW News Marathi
देश / विदेश

NewYear2019 : गुगलने दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

मुंबई | नवीन वर्ष २०१९चे जगभरात जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. गुगलने डुडलच्या स्वरुपात आपल्या खास शैलीत २०१९चे स्वागत केले आहे. नववर्षानिमित्त खास डुडल बनवून गुगलने नववर्षाचे स्वागत केले आहे. या डुडलमध्ये हत्तीचे दोन पिल्ले दिसत असून ते फुग्यासोबत खेळत आहेत. दोघांनीही रंगीबेरंगी टोप्या घातल्या असून आजुबाजुला फुगे पसरलेले या डुडलमध्ये दिसत आहे.

गुगलने बनलेल्या डुडलमध्ये वरच्या बाजुला सजावट म्हणून झालर लावली असून त्यावर गुगल लिहिलेले दिसत आहे. त्याच्यावर घडीही दिसत असून त्यात १२ वाजलेले दिसतेय. नवीन वर्ष आल्याचे ही घडी आठवण करून देतेय. गुगलवर ३१ डिसेंबर म्हणजेच न्यू इअरच्या सायंकाळी हे डुडल दिसत होते. दोन्ही हत्तीचे पिल्ले खेळताना दिसत आहेत.

नवे वर्षाचे जगभरात जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. गुगलच्या होमपेजवर खास व्यक्ती, दिन, सण, विशेष घटना या सर्वांची आठवण म्हणून गुगल विशेष डुडल बनवत असते. गुगलने सर्वात आधी म्हणजे १९९८ साली पहिले डुडल बर्निंग मेन फेस्टिव्हल निमित्त बनवले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून ५१ लाखांची मदत जाहीर

News Desk

‘ममता बॅनर्जींकडून हिंदी दिवसाच्या दिल्या शुभेच्छा!’

News Desk

ईद साजरी करताना घरात घुसून दहशतवाद्यांचा बेछूट गोळीबार

News Desk