नवी दिल्ली | “भारताचा भविष्यात जर पाकिस्तानसोबत संवाद झाला तर तो पाकव्याप्त काश्मीर याच मुद्द्यावरून असेल”, असे स्पष्ट विधान केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. राजनाथ सिंह विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणामध्ये आयोजित भाजप यात्रेत बोलत होते. त्यामुळे कलम ३७० रद्द केल्यानंतर आता भारताचे संपूर्ण लक्ष पाकव्याप्त काश्मीरकडे असणार असल्याचे राजनाथ सिंह यांच्या या विधानातून स्पष्ट होत आहे. काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात सुरु केलेल्या कुरघोड्यांच्या पार्श्वभूमीवर काहीच दिवसांपूर्वी राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला नाव न घेता इशारा देखील दिला होता.
Rajnath Singh in Panchkula,Haryana: Article 370 was abrogated in J&K for its development.Our neighbour is knocking doors of intl. community saying India made a mistake.Talks with Pak will be held only if it stops supporting terror. If talks are held with Pak it will now be on PoK pic.twitter.com/HBm7EIeezL
— ANI (@ANI) August 18, 2019
“कलम ३७० हे काश्मीरच्या प्रगतीत अडथळा बनत होते. म्हणून हे कलम रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, आता आपले शेजारी देश हा निर्णय घेऊन भारताने चूक केल्याचे सांगत संयुक्त राष्ट्रांची दारे ठोठावीत आहेत. मात्र, आता भविष्यात जर भारताने पाकिस्तानशी संवाद साधला तो पाकव्याप्त काश्मीरच्याच त्याचप्रमाणे दहशतवादी संघटनांना बळ न देण्याच्या मुद्द्यावर असेल”, असे स्पष्ट विधान राजनाथ सिंह यांनी केले आहे.
“आजपर्यंत भारताने कधीही प्रथम अण्वस्त्रांचा वापर केलेला नाही. परंतु, भविष्यात काय घडेल ते त्या त्या परिस्थितीवर अवलंबून आहे”, असे सूचक विधान काहीच दिवसांपूर्वी राजनाथ सिंह यांनी केले आहे. सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तानकडून भारताविरोधात कुरघोड्यांना सुरुवात झाली. या निर्णयानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये कमालीची तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला हा सूचक इशारा दिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.