HW Marathi
देश / विदेश

नीरव मोदी प्रकरणाची पुढील सुनावणी २९ मार्च रोजी, वेस्ट मिनस्टर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला हिरेव्यापारी नीरव मोदीला आज (२० मार्च)  लंडनमध्ये अटक करण्यात आले होते. नीरव मोदीला अटक केल्यानंतर लंडनच्या वेस्ट मिनस्टर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात सुनावणी संपली असून या प्रकरणाची पुढील  शनिवारी २९ मार्च रोजी होणार आहे.

नीरव मोदी प्रकरणातील सर्व कागपत्रे घेऊन एक पथक लंडनमध्ये दाखल झाली असल्याची माहीत अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी)  दिली आहे. नीरव मोदी ब्रिटन सरकारला सर्व प्रकारचे सहकार्य करणार असून त्यांनी लंडनमध्ये सर्व टॅक्स आणि प्रवासाची कागदपत्रे न्यायालयाकडे सुपूर्त करणार आहे. तसेच  लंडनच्या वेस्ट मिनस्टर न्यायालयाने २९ मार्चपर्यंत नीवर मोदीची जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Related posts

धक्कादायक ! भारतीय बँकाच्या घोटाळ्यात ७२ टक्क्यांनी वाढ

News Desk

अदनानचा अपमान, भारतीय कुत्रे’ म्हणून हिणवले

News Desk

अंतराळात ‘मिशन शक्ती’मुळे ४०० तुकडे, नासाची भीती

News Desk