HW Marathi
देश / विदेश

नीरव मोदीला लवकरच होणार अटक, लंडन न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली | लंडन न्यायालयाने अखेर पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३,००० कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला हिरेव्यापारी नीरव मोदीची पत्नी आमी मोदी हिच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी (१५ मार्च) नीरव मोदी विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्याचप्रमाणे ईडीने (ईडी) नीरव मोदीविरुद्ध दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेत विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी नीरव मोदीची पत्नी आमी मोदीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी होते. त्यानंतर, आता लंडन न्यायालयानेही नीरव मोदीला अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

बँकेकडून घेतलेल्या कर्जातून आमी मोदी हिने न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्क परिसरात मालमत्ता विकत घेतली होती. त्यामुळे आमीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची ईडीची विनंती विशेष न्यायालयाने मान्य केली होती. आमी मोदी हिने बँकेचे पैसे बहीण पूर्वी हिच्या साहाय्याने वळते करून त्यातून न्यूयॉर्क येथील सेंट्रल पार्क परिसरातील मालमत्ता विकत घेतली होती. त्याचप्रमाणे, मोदीच्या अमेरिकेतील दोन स्थावर मालमत्ता देखील ईडीने जप्त केल्या आहेत. भारतानेही लंडनकडे नीरव मोदीला भारताकडे सोपिवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता लवकरच नीरव मोदीला देखील बेड्या ठोकण्यात येऊ शकतात.

Related posts

दुबईतील ७४ मजली टॉवर पेटला

News Desk

स्मार्टफोनच्या सुरक्षेचे काय?

News Desk

मोदी प्रेमाने जोडपे दुभंगले

News Desk