नवी दिल्ली | संपूर्ण देशाला सुन्न करणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही नराधमांना आज (२० मार्च) अखेर फासावर लटकविण्यात आले आहे. तिहार तुरुंगामध्ये या प्रकरणातील चारही आरोपींना आज सकाळी ठीक ५.३० वाजता फासावर लटकविण्यात आले आहे. निर्भयाचे कुटुंबीय तिला न्याय मिळवून देण्यासाठी गेली तब्बल ७ वर्षे ३ महिने संघर्ष करत होते. अखेर आज त्यांच्या या संघर्षाला यश आले आहे. दरम्यान, या चारही नराधमांना फाशी दिल्यानंतर निर्भयाची आई आशा देवी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “उशिरा का होईना पण न्याय मिळाला आहे. आजचा हा दिवस देशातील सर्व मुलींच्या, महिलांच्या नावे“, अशी भावनिक प्रतिक्रिया यावेळी आशा देवी यांनी माध्यमांनाही बोलताना दिली आहे.
Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: Our daughter is no more & won't return.We started this fight after she left us, this struggle was for her but we will continue this fight in future for our daughters. I hugged my daughter's picture & said 'finally you got justice' https://t.co/Bqv7RG8DtO pic.twitter.com/XBeAJYC8of
— ANI (@ANI) March 20, 2020
Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: Finally they have been hanged, it was a long struggle. Today we got justice, this day is dedicated to the daughters of the country. I thank the judiciary & government. https://t.co/Bqv7RG8DtO pic.twitter.com/llBXtTYt6B
— ANI (@ANI) March 20, 2020
“अखेर त्यांना फासावर लटकविण्यात आले आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ४ जणांना अशा पद्धतीने एकत्र फासावर लटकविण्यात आले आहे. आजच्या दिवशी निर्भयाला न्याय मिळाला आहे. आजचा हा दिवस देशातील सर्व मुली, महिलांचा आहे. उशिरा का होईल न्याय मिळाला आहे. यासाठी मी आपली न्याय व्यवस्था, राष्ट्रपती आणि सरकारचे मनःपूर्वक आभार मानते. या दोषींना फाशी होऊ नये, यासाठी एकावर एक अनेक याचिका दाखल करण्यात आल्या, फाशी वारंवार पुढे ढकलण्यात आली. यातून आपल्या न्यायव्यवस्थेतील काही त्रुटी देखील समोर आल्या. मात्र, अखेर न्याय मिळाल्याने देशातील जनतेचा न्याय व्यवस्थेवरील हा विश्वास कायम टिकून राहील”, अशा शब्दांत आशा देवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.