नवी दिल्ली | भारतीय अर्थव्यवस्थेच्या अवस्था वाईट असल्याने देशभरातून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनीही देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीवर मोठा खुलासा करताना देशात अभूतपूर्व मंदीची स्थिती असून अर्थव्यवस्था धोक्यात असल्याचे म्हटले जात होते. हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली जातेय. त्यामुळे जनताही धसका घेतला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषद घेऊन अर्थव्यवस्था भक्कम असल्याचे सांगितले.
Finance Minister Nirmala Sitharaman: The revision of one-time registration fee deferred till June 2020. Additional 15% depreciation on all vehicles acquired from now till 31st March 2020. https://t.co/SEvSTk2uEv
— ANI (@ANI) August 23, 2019
निर्मला सीतारामण जगभरात मंदीचा सामना करत असल्याचे म्हटले जात आहे. पुढे त्या असे देखील म्हणाल्या, जगभरातील अभ्यास केल्यास लक्षात येईल, की अशी परिस्थिती फक्त भारतात नसून सर्वांनाच सामना करावा लागत आहे. जगाशी तुलना केल्यास भारतीय अर्थव्यवस्था सक्षम आहे. जगातील अनेक देशात मंदीची लाटच आहे. त्यामागचे कारण अमेरिका आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉर आहे. त्यावेळी अर्थव्यवस्थेला थोडी गती देऊ शकतील, अशा १२ प्रमुख घोषणा त्यांनी केल्यात.
१) शेअर बाजारातील भांडवली नफ्यावरील अधिभार हटणार.
२) रेपो रेटमध्ये कपात केल्यावर व्याजाचे दर लगेच कमी होणार. बँकांना त्याचा लाभ ग्राहकांना द्यावा लागणार.
३) व्याजदर घटल्यानं ईएमआय कमी होणार. गृह आणि वाहन कर्ज घेणाऱ्यांना ‘अच्छे दिन’.
४) सरकारी बँकांना ७० हजार कोटींचा निधी देणार केंद्र सरकार. कर्जवाटपातील अडचणी होणार दूर.
५) ३१ मार्च २०२० पर्यंत खरेदी केलेली BS-4 वाहनांना हिरवा कंदील.
६) ईव्ही आणि BS-4 गाड्यांची नोंदणी सुरूच राहणार
७) कर्जाच्या अर्जांची ऑनलाइन छाननी होणार.
८) कर्जाची परतफेड केल्यानंतर सर्व कागदपत्रं बँकांना १५ दिवसांच्या आत परत करावी लागतील.
९) स्टार्ट अप टॅक्सची प्रकरणं मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र विभाग.
१०) डीमॅट अकाउंटसाठी आधारमुक्त केवायसी.
११) वाहनांच्या भरभक्कम नोंदणी शुल्कातून जून २०२० पर्यंत दिलासा
१२) ३० दिवसांत जीएसटी रिफंड. जीएसटी प्रक्रिया होणार सोपी.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.