HW News Marathi
देश / विदेश

नीरव मोदीच्या ९ कार ईडीकडून जप्त

नवी दिल्ली | ईडीने नीरव मोदीच्या ९ आलिशान कार जप्त केल्या आहेत. पंजाब नॅशनल बँकेतील साडे अकरा हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर फरार असलेला नीरव मोदी आहे. ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या कारमध्ये एक रोल्स रॉयस घोस्ट, दोन मर्सिडिज, एक पोर्शे, तीन होंडा, एक टोयोटा फॉर्च्युनर आणि एका टोयोटा इनोव्हाचा समावेश आहे.

जप्त केलेल्या नऊ कारची किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यातील रोल्ज रॉयस कारची किंमत सुमारे ६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. यासोबतच ईडीने नीरव मोदीचे म्युच्युअल फंड आणि शेअर्सही गोठवले आहेत. या शेअर्सची किंमत साधारण ७.८० कोटी रूपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘ग्लोबल टीचर पुरस्कारा’मुळे भारताची मान उंचावली । दत्तात्रय भरणे

News Desk

अंडरवर्ल्ड अबू सालेमला 22 ऑगस्टला शिक्षा

News Desk

सलग तीन दिवस राज्यातील सत्तांतरावर युक्तीवाद पूर्ण; सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला निकाल

Aprna
महाराष्ट्र

मुंबईला महाराष्ट्रापासून कोणत्याही परिस्थिती तोडू शकत नाही

News Desk

पुणे | आरक्षण आर्थिकदृष्ट्या असावे, मग तो कोणत्याही जातीचा असेल, अशी भूमिका काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणत्याही परिस्थिती तोडू शकत नाही, त्यासाठी सतत जागृत रहावे लागणार आहे’ असे यावेळी त्यांनी म्हटले. ही एक ऐतिहासिक मुलाखत म्हणावे लागेल. कारण यात राज यांनी पवारांची संपूर्ण राजकीय कारकर्दीचा आढाव घेण्याचा प्रयत्न केला.

या मुलाखतीत बोलताना अनेक गोष्टीचा उलघड झालेला दिसून आहे. पुण्यात ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली. त्यावेळी पवारांनी राज यांच्या रोखठोक प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली.

भाजपाच्या पूर्वी आणि आताच्या पंतप्रधान मंत्र्यांतील फरक

महिन्या भरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत गांधी कुटुंबियावर वैयक्तिक टीका केली होती. गांधी कुटुंबियांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहेत. कोणत्याही व्यक्तीवर वैयक्तिक टीका करणे हे माझ्या चौकटीत बसत नसल्याचे बोलून पवारांनी मोदींवर टीका केली. तसेच भाजपचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी नेहमीच विरोधी नेते, त्यांची मते शांतपणे ऐकूण घेतली होती. कधी कोणावर वैयक्तिक टीका केली नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. भाजपामधील पंतप्रधानांचा फरक सांगून मोदींवर टीका केली.

यशवंतराव चव्हाण पवारांचे आदर्श

यात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या नेत्यांनी गैरवर्तन केल्यामुळे चव्हाणांंनी विधानसभेत सर्वांची माफी मागितली. तेव्हा नेते ही समाजाचे सेवक असून त्यांनी लोकांशी व्यस्ती कसे वागावे असा आदर्श त्यांनी माझ्या डोळ्यासमोर आदर्श ठेवला होता.

तसेच यशवंतराव चव्हाणांनी म्हटेल होती की, महाराष्ट्रापेक्षा नेहरु मोठे आहेत? तुम्हा असे का? म्हटेल असा त्यांना केला होता, तेव्हा ते म्हटले की, देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर सर्व विविध जाती-जमातीतील लोकांना एक सूत्रांत बांधून ठेवले. मी आधी राष्ट्राचा विचार करतो, मग राज्या विचार करतो असे मत चव्हाणांनी व्यक्त केले होते.

इतर राज्याचे नेते केंद्रात गेल्यानंतर त्यांच्या राज्याला प्रथम प्राधान्य देतात, पण आपण मराठी माणसे तसे का? करत नाहीत? हे बोलून राज ठाकऱ्यांनी मोदी जेव्हा परदेशातील नेते भारतात येता. तेव्हा ते त्यांना गुजरातला नक्की नेतात, असे प्रश्न विचारुन ठाकऱ्यांनीही मोदींवर टीका केली.

तसेच प्रत्येक नेत्यांनी त्यांच्या राज्याचा आभिमान बाळगला पाहिजेलच. पण, सर्वप्रथम देशाचा विचार करणे गरजेचे असे उत्तर देऊन पवारांनी मोदींवर निशाणा साधला. या प्रश्नावरुन दोन्ही नेत्यांनी मोदींचा समाचार घेतला.

बाळासाहेब ठाकरेंशी घरोब्याचे संबंध

बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी घडलेली गोष्ट सांगितली. ‘सुप्रिया लहान असताना बाळासाहेबांच्या घरी खेळायला जायची. पुढे जेव्हा तिला राज्यसभेची उमेदवारी द्यायचे ठरले त्यावेळी बाळासाहेबांनी मला फोन केला. यावेळी त्यांची भूमिका विचारली. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले, आमची मुलगी निवडणूक लढवणार म्हणल्यावर माझी वेगळी भूमिका काय असणार. तुम्ही निश्चित रहा ती बिनविरोध निवडून येईल. यावेळी मी भाजपबद्दल विचारले. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते की ‘तुम्ही कमळीची काळजी’ करु नका. सुप्रिया बिनविरोध निवडून येईल. आणि खरंच सुप्रिया बिनविरोध निवडून आली. पार्लमेंटमध्ये बिनविरोध निवडून येणे सोपे गोष्ठ नव्हती जी घडली.

१९९३च्या वेळीस दंगलीच्या पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

त्यावेळचे पंतप्रधान नरसिम्हा राव संपूर्ण जगाचे मुंबईकडे लक्ष्य लागले आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. सध्या मुंबई पेटत आहे. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला आता तुमची गरज असल्याचे नरसिम्हा राव यांनी सांगतले. त्यामुळे मी पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्र पद स्वीकारले.

छत्रपती शिवाजी महाराज शाहू, फुले आणि आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत

प्रत्येक राज्यातील एक महान व्यक्ती असतो की, त्यांच्या नावे त्या-त्या राज्यातील सर्व लोक एकत्र येतात. तसेच महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे जागातील कानाकोपऱ्यात असणारा मराठी माणूस एकत्र येतात. शाहू फुलेचा महाराष्ट्र म्हणजे लोकांना एक सुत्रांत ठेवण्यात मोठा हात आहेत. फुले, आंबेडकर आणि शाहू यांनी जातपात यांच्या विरोधात आवाज उटवून सर्व मराठी लोकांना एक सूत्रांत बांधण्याच प्रयत्न केला. म्हणून हा शिवाजी, शाहू, फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, असे मी नेहमी म्हणतो.

मुलाखतीच्या शेवटी राज ठाकरेंनी रॅपिड फायर राऊंड घेतला. यात त्यांनी पहिला प्रश्न विचारला तुम्हाला कोण आवडतात – यशवंतराव चव्हाण की इंदिरा गांधी? यावर पवारांनी उत्तर दिलं

दोघांचही योगदान महत्वाचं आहे.

  • राज ठाकरे – शेतकरी की उद्योगपती ?
  • शरद पवार – शेतकरी
  • राज ठाकरे – मराठी की अमराठी उद्योगपती?
  • शरद पवार – उद्योगपती
  • राज ठाकरे – दिल्ली की मुंबई?
  • शरद पवार -दिल्ली
  • आणि शेवटचा प्रश्न विचारताना राज ठाकरे म्हणाले, मीही या प्रश्नाचा आतुरतेनं वाट पाहतोय तो प्रश्न असा…
  • उद्धव की राज ?
  • पवारांचं उत्तर – ठाकरे कुटुंबिय

Related posts

मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही सेनेला वाटाण्याच्या अक्षता, गितेंच्या वक्तव्यावर दरेकरांची प्रतिक्रिया!

News Desk

नरेंद्र मोदींना ‘मोदीभक्तांकडून’ अनौखी भेट!

News Desk

“फडणवीसजी काय राव तुम्ही तुमच्यामुळे मुख्यमंत्र्यांना पण घराबाहेर यावं लागतं”, चित्रा वाघ यांचा टोमणा

News Desk