HW News Marathi
देश / विदेश

‘सरकार फक्त लोकांना फुकट पगार देण्यासाठी आहे का?, गडकरींनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर  

नवी दिल्ली | केंद्रीय रस्ते वाहतूकीसह सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभारही त्यांच्याकडे आहे. या मंत्रालायाच्या एका कार्यक्रमात गडकरी यांनी सरकारी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. गडकरी यांनी यावेळी गायी आणि म्हशीचं उदाहण देऊन अधिकाऱ्यांना सुनावलं. ‘आपण गायी म्हशी घरी पाळतो. त्यांनी चांगलं दूध द्यावं म्हणून भरपूर खुराक देतो. पण खुराक दिल्यानंतरही दूधच मिळत नसेल, तर अशा जनावरांचा काय उपयोग?’ असा प्रश्न गडकरी यांनी या कार्यक्रमात विचारला.

सरकारी अधिकाऱ्यांच्या अधिक आवश्यकतेच्या मागणीचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. ‘सरकार फक्त लोकांना फुकट पगार देण्यासाठी आहे का? इतके अधिकारी आणि एवढ्या गुंतवणुकीची गरज काय? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये NHAI च्या इमारतीच्या उद्धघाटन कार्यक्रमात बोलतानाही त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सुनावलं होतं. UPA-1 च्या कार्यकाळात मंजूर झालेल्या त्या इमारतीचं काम NDA सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पूर्ण झालं. त्याबद्दल गडकरींनी नाराजी व्यक्त केली होती. ‘काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे फोटो लावायला हवेत’ अशी सूचना गडकरी यांनी त्या कार्यक्रमात केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना-राष्ट्रवादी शेतकरी विधेयकावरून राज्यसभेत भाजपची कोंडी करणार ?

News Desk

लॉकडाउन हे पॉज बटनासारखे आहे, कोरोना थांबल्यासारेख वाटेल पण जाणार नाही !

News Desk

भारताची कारवाई पाकिस्तानच्या जिव्हारी, संसदेत दिले ‘इम्रान खान मुर्दाबाद’चे नारे

News Desk