HW News Marathi
देश / विदेश

न्या. लोया मृत्यूप्रकरण | चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली: न्यायमूर्ती ब्रिजमोहन लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी होणार नाही असा निर्णय गुरुवारी सुप्रीम कोर्टाने दिला. लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. हा निर्णय सांगताना सुप्रीम कोर्टाने जनहित याचिकेचा गैरवापर होत असल्याचे नमूद केले आहे.

यावेळी न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, लोयांसोबत जे इतर न्यायाधीश प्रवास करत होते, त्यांच्यावर संशय व्यक्त करु शकत नाही. ज्या पद्धतीने जनहित याचिकांचा राजकीय वापर होत आहे, ते पाहता हा न्यायपालिकांच्या बदनामीचा प्रयत्न आहे असेही ते यावेळी म्हणाले. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या याचिकांवर सरन्यायाधीश दीपक मिश्रां यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी अंतिम सुनावणी झाली.

काय आहे न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरण

गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात सुनावणी करणारे जज लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात भाजप अध्यक्ष अमित शहा आरोपी होते. नागपुरात 1 डिसेंबर 2014 रोजी लोया यांचा मृत्यू झाला होता. सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नाला जात असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. मात्र लोया यांच्या बहिणीने त्यांच्या मृत्यू प्रकरणी प्रश्न उपस्थित केले होते. लोया यांचा सोहराबुद्दीन केसशी असलेला संबंध आणि त्यांचा झालेला मृत्यू यावरुन संशय उपस्थित केले गेला. त्यामुळे लोया यांच्या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

काय आहे सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण

गुजरात येथे सोहराबुद्दीन शेख, त्यांची पत्नी कौसर बी आणि त्यांचे सहकारी तुलसीदास प्रजापती यांचा नोव्हेंबर 2005 मध्ये कथित बनावट चकमकीत मृत्यू झाला . पोलीस कर्मचाऱ्यांसह 23 आरोपींवर यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आधी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते, त्यानंतर ते मुंबईला ट्रान्सफर करण्यात आले. या प्रकरणात विषेश बाब म्हणजे भाजप अध्यक्ष अमित शहा या प्रकरणात आरोपी होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातासंदर्भात घेतला मोठा निर्णय

Aprna

शबरीमला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी उघडणार ?

swarit

आधी अमित शहा आता कर्नाटकच्या भाजप मुख्यमंत्र्यांची शरद पवारांनी घेतली भेट !

News Desk