HW News Marathi
राजकारण

माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायकांची राजकारणात एन्ट्री

ओडिशा | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी विजू जनता दल या पक्षात प्रवेश करून नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या उपस्थित बुधवारी सायंकाळी अरुप पटनायक यांनी पक्षात प्रवेश केला.

ओडिशाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या माहितीनुसार अरुप पटनायक यांना भुवनेश्वर किंवा पुरी या दोन्ही पैकी एका मतदारसंघातून तिकीट देण्यात येणार असल्याच्या चर्चा ओडिशाच्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

अरुप पटनायक हे महाराष्ट्र केडरच्या १९७९च्या बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत. त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात ३६ वर्षे काम केले आहे. पटनायक हे मुंबईचे पोलीस आयुक्त सुद्धा राहीले आहेत.

२००३ मध्ये विशिष्ट सेवेसाठी प्रेसिडेंट पुलिस मेडल मिळाले असून १९९४ मध्ये पटनायक यांना इंडियन पोलीस मॅडल देऊन सन्मानित करण्यात आले होते. २०११मध्ये पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांच्याकडून मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता. पटनायक ३० सप्टेंबर २०१५ रोजी सेवा निवृत्त झाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…मग शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन का नाही ?

News Desk

“हे सरकार षंड आणि नामर्दासारखे…”, संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

Aprna

मनमोहन सिंग यांनी राज्यसभेसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज

News Desk