HW News Marathi
देश / विदेश

हाथरस पीडितेचे फोटो आंदोलनांदरम्यान वापरल्याने स्वरा भास्कर,दिग्विजय सिंह यांना नोटीस

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमध्ये हाथरस येथे घडलेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचे फोटो आंदोलनांमध्ये वापरल्याची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी महिला आयोगाने अभिनेत्री स्वरा भास्कर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि भाजपाच्या आयटीसेलचे प्रमुख अमित मालवीय यांना स्वतंत्ररित्या नोटीसा पाठवल्या असून यावर स्पष्टीकरणही मागवले आहे. सोशल मीडियातील पोस्टमध्ये आणि आंदोलनांदरम्यान हाथरस येथील बलात्कार पीडितेचे फोटो वापरण्यात आले.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशनुसार, बलात्कार पीडित महिलेची कोणत्याही प्रकारे माध्यमांतून ओळख उघड होता कामा नये. मात्र, हाथरस पीडितेबाबत या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे ज्या लोकांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटिसा पाठवल्या आहेत. तसेच त्यांना आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवरुन पीडितेचे फोटो हटवण्यात यावेत तसेच नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

१४ सप्टेंबर रोजी हाथरस येथे एका १९ वर्षीय दलित तरुणीवर गावातील कथीत सवर्ण समाजातील चार तरुणांनी सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर तिची जीभ कापत, मानेतील माणका मोडत जीवे मारण्याच्या हेतूने अमानुष मारहाण केली. अशा भीषण परिस्थितीत पीडित मुलीला दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी तिचा उपाचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर योगी यांनी मुख्यमंत्री पदावरुन राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय अंतराळवीर आता जाणार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर

Gauri Tilekar

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

News Desk

अयोध्येचा प्रश्न कश्मीरसारखा बनू नये !

News Desk