HW News Marathi
महाराष्ट्र

सुशांतच्या मालमत्तेसाठी त्याला ड्रग्स दिले, प्रताप सरनाईकांचा दावा

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणातील राजकारण रोज नव्याने वळण घेत आहे. दरम्यान, सुशांतची हत्या झाली नसून ती आत्महत्याच आहे हे सिद्ध झाले आहे. आता शिवसेनेतील एका मोठ्या नेत्याने सुशांतच्या बहिणींवरच गंभीर आरोप लावले आहेत. सुशांतच्या मालमत्तेसाठी त्यांनी त्याला ड्रग्स दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘सुशांत सिंहची बहिण त्याला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय काही औषध देत होती. ज्यामुळे तो ड्रग्सच्या आहारी जाईल आणि त्याची प्रॉपर्टी हडप करता येईल? असा त्यांचा डाव होता का? या अँगलने तपास होण्याची गरज आहे. त्यामुळं मी मुंबई पोलीस आयुक्तांना यासंदर्भात तपास करण्याची विनंती केली,’ असं शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

 

मुंबई पोलिसांना केवळ ट्रोलिंगच नव्हे तर सोशल मीडियावरून शिविगाळही केली गेली अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली. मुंबई पोलिसांना बदनाम केले जात होते. एका ठराविक हेतूने हे कॅम्पेन चालवले जात होते. अनेक फेक अकाऊंटची ओळख पटलेली आहे. हे कोण चालवत होते, त्यामागे कोण होते. याचा तपास सुरू आहे. हजारोंच्या संख्येनं ही फेक अकाउंट असल्यांचं परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पार्थ पवार यांची ‘सत्यमेव जयते’कडे वाटचाल सुरू, चंद्रकांत पाटील यांचे मोठे वक्तव्य

News Desk

‘आम्हाला फक्त ब्रम्हज्ञान त्यांच्यासाठी कोरडे पाषाण’, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!

News Desk

HW Exclusive : मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणी मला अडकवण्यात मुख्यमंत्र्यांचा हात, दरेकरांचा आरोप

Aprna