HW Marathi
देश / विदेश

आता ४० लाख टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना जीएसटी भरावा लागणार नाही !

नवी दिल्ली | जीएसटी कौन्सिलच्या आज (१० जानेवारी) झालेल्या बैठकीत उद्योजकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या कंपन्यांचा टर्नओव्हर ४० लाख असेल त्या कंपन्यांना जीएसटी लागू होणार नसल्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. जीएसटी कौन्सिलच्या २२ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या बैठकीत ज्या उत्पादनांवर २८% जीएसटी लागू होता अशी ७ उत्पादने १८% जीएसटी लागू असणाऱ्या उत्पादनांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली होती. या व्यतिरिक्त अन्य ४० उत्पादनांवरील जीएसटीच्या दरांमध्ये कपात करण्यात आली होती.

Related posts

ओडिसामध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

News Desk

लवकरच रामदेवबाबांची जिन्सही बाजारात!

News Desk

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, कुलभूषण जाधववर भलतेच आरोप

News Desk