HW News Marathi
देश / विदेश

आता हेलिकॉप्टरमधून घ्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पाहण्याचा आनंद

गुजरात | जगातील सर्वात भव्य प्रतिमा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरले आहेत. त्यामुळे पर्यटकांमध्येही स्टॅच्यू ऑफ युनिटीला पाहण्याची प्रचंड उत्कंठा आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात मोठी प्रतिमा असलेली स्टॅच्यू ऑफ युनिटी तुम्हाला हेलिकॉप्टरमधूनही पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच स्टॅच्यू ऑफ युनिटीला पाहण्यासाठी हेलिकॉप्टर राइड लाँच करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अवकाशातून तुम्हाला फक्त १० मिनिटांत स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला मिळणार आहे. त्यासाठी पर्यटकांना २९०० रुपये मोजावे लागणार आहेत.

तसेच हेलिकॉप्टरमधून तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीशिवाय व्हॅली ऑफ फ्लॉवर आणि सरदार सरोवर बांध पाहू शकणार आहात. ही राइड स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या हेलिपॅडपासून सुरू होणार आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीला अवकाशातून पाहण्यासाठी संधी हवाई सर्व्हिस हेरिटेज एव्हिएशनने उपलब्ध करून दिली आहे. या सेवेची सुरुवात करणारे ब्रीजमोहन म्हणाले की, आतापर्यंत आम्ही उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात लोकांना राइडवर नेले होते. परंतु आता गुजरात सरकारच्या मदतीने सरदार सरोवर बांध आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी दाखवणार आहोत. एका वेळी हेलिकॉप्टरमध्ये ६ ते ७ जण बसू शकणार आहेत.

तुम्ही हवाई सफरची बुकिंग कसे

हेलिकॉप्टर सुविधा सुरू केल्याच्या पहिल्याच (२५ डिसेंबर) दिवशी ५५ जणांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या हवाई सफरची मजा घेतली. पहिल्या टप्प्यात एकच हेलिकॉप्टर ठेवण्यात आले होते आहे. जर प्रवासी जास्त असले तर दोन हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच गुजरात टुरिझमच्या वेबसाइटवरूनही या राइडचे बुकिंग करता येणार आहे. सर्वसामान्य पर्यटकांमध्ये मात्र स्टॅच्यू ऑफ युनिटी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. सरदार पटेल यांची भव्य प्रतिमा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच १८२ मीटर उंचीच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ३१ ऑक्टोबर रोजी लोकार्पण करण्यात आले होते. परंतु या पुतळ्याची प्रवेश फी ही जगप्रसिद्ध ताहमहलच्या प्रवेश फीपेक्षा सातपट अधिक महाग असल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली होती. तरीही येथे भेट देणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण घट न होता उलट वाढच झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बलात्कारचा प्रयत्न फसल्याने इमारतीवरून ढकलले

News Desk

ऐकावे ते नवलच ‘आदर्श सून’ होण्याचा कोर्स

News Desk

अटल बिहारी वाजपेयी पंचतत्त्वात विलीन, मुलगी नमिताने दिला मुखाग्नी

News Desk