HW News Marathi
देश / विदेश

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची लिफ्ट अवघ्या १५ दिवसात बंद

अहमदाबाद | जगातील सर्वात उंच असा स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लोकार्पण सोहळ्याला अवघे १५ दिवस सुद्धा उलटले गेले असतानाच लिफ्ट बंद पडल्याची घटना मंगळवारी (१३ नोव्हेंबर)ला घडली. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा ड्रीम प्रॉजेक्ट असल्याचे म्हटले जाते. हा पुतळा उभारण्यासाठी जवळपास २,९८९ कोटींचा खर्च आला आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या येथे असलेली या लिफ्टमध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्यासह गुजरातचे सौरभ पटेल त्यांच्या अन्य अधिकारीसोबत अडकल्याची माहिती मिळाली आहे. ही लिफ्ट बंद पडण्यामागचे कारण क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्यामुळे असल्याची माहिती मिळाली आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटी हे ऐक्याचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात आला असून ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला होता. अवघ्या काही दिवसात सर्वसामान्य पर्यटकांमध्ये मात्र स्टॅच्यू ऑफ युनिटी आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे. केवळ दिवाळीच्या सुट्टीमध्येच सुमारे ७५ हजार पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली असून, केवळ येथील तिकीटविक्रीमधूनच सुमारे अडीच कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी व्हेंटिलेटरवर 

News Desk

अशोक चव्हाण दिल्लीत दाखल, ‘या’साठी चव्हाणांची दिल्लीवारी

News Desk

एकहाती सत्तेचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील ! उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला

News Desk