HW News Marathi
देश / विदेश

आता देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यास लष्कराला इस्रोची मदत

नवी दिल्ली | भारत-पाकिस्तान सीमेवर दहशतवाद्यांकडून वारंवार होणारी घुसखोरी रोखण्यासाठी आता इस्रोची (भारतीय अवकाश संशोधन संस्था) भारतीय लष्कराला मोठी मदत होणार आहे. नियंत्रण रेषेवरील सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी इस्रो भारतीय लष्कराला मदत करणार आहे. पाकिस्तान, बांग्लादेश आणि इतर देशांच्या सीमांवर नजर ठेवण्यासाठी इस्रो एक विशेष उपग्रह लॉन्च करणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती गुरुवारी (१७ जानेवारी) सरकारकडून देण्यात आली आहे.

भारतीय सीमा सुरक्षेसाठी पायाभूत सुविधेत वाढ करण्यासोबतच सीमांचे संरक्षण करण्याकरिता अंतराळ तंत्रज्ञानाची मदत घेण्याची एका समितीकडून सरकारला करण्यात आलेली सूचना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे आता लवकरच सीमा सुरक्षा दलांना अत्याधुनिक उपकरणे देण्यात येणार आहेत. पुढील ५ वर्षांत या योजनेवर गृह मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय एकत्रितपणे काम करतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द ! मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाला वर्ष पूर्ण

News Desk

…भगतसिंग नास्तिक होते ?

News Desk

लातूरमधून जम्मू-काश्मीरचे ४ जण ताब्यात, दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय

News Desk