HW Marathi
देश / विदेश

खुशखबर ! आता रेल्वे प्रवास होणार स्वस्त

नवी दिल्ली | देशभरातील रेल्वे प्रवास हा येत्या १५ जानेवारीपासून स्वस्त होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या फ्लेक्सी फेयर स्कीममध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे राजधानी, शताब्दी आणि दुरांतो यासारख्या प्रीमिअम एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकीटाचे दर कमी होतील. यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात रेल्वेकडून प्रायोगिक तत्त्वावर काही एक्स्प्रेस गाड्यांसाठी फ्लेक्सी फेयर स्कीम रद्द केली होती. फ्लेक्सी फेयर स्कीममुळे आरक्षित होणाऱ्या तिकीटांची संख्या वाढत जाते त्याप्रमाणे दरही वाढतात. मात्र, ही स्कीम रद्द झाल्याने तिकीटांचे दर स्थिर राहतील. ज्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये महिन्याला ५० टक्के आसने भरतात त्या गाड्यांमधून सहा महिन्यांसाठी फ्लेक्सी फेयर स्कीम रद्द केली जाईल. तर ज्या गाड्यांमधील ५० ते ७५ टक्के आसने भरतात त्याठिकाणी ऑफ सिझनमध्ये फ्लेक्सी फेयर स्कीम नसेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Related posts

दहशतवादी तळ निर्माण होत राहील तोपर्यंत आम्ही कारवाई करत राहणार | भारतीय लष्कर

News Desk

राज्यसभा निवडणूक वाद, उच्च न्यायालयात याचिका दाखल

News Desk

कर्नाटकात इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

News Desk