नवी दिल्ली | अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे ५ ऑगस्टला अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला महंत नृत्यगोपाल दास हजर होते. यावेळी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या संपर्कात आले होते.
CM has taken details of the health status on Mahant Nitya Gopaldas (in file pic) who has tested COVID19 positive. He has spoken to DM Mathura and to Dr Trehan of Medanta and requested for immediate medical attention for him at the hospital: Chief Ministers' Office pic.twitter.com/w3T8LN9Afz
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 13, 2020
५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले होते. मंचावर फक्त पाच लोकांनाच परवानगी होती. यामध्ये महंत नृत्यगोपाल दास यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हजर होते. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यावेळी अनेकदा महंत नृत्यगोपाल दास यांच्याजवळ गेले होते.
मंचावर महंत नृत्यगोपाल दास आणि नरेंद्र मोदी यांच्यासहित उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. सरसंघचलाक मोहन भागवत आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होते. आता हे सगळे जण कोरंटाईन होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.