नवी दिल्ली | राज्यसभेचे नवे निर्वाचित खासदार आज (२२ जुलै) शपथ घेणार आहेत. देशात सध्या कोरोनाचे संकट घोंघावत आहेत. त्यामुळे हा शपथ विधी राज्यसभेत होणार नसून राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये ११ वाजता होणार आहे. देशातील २० राज्यांमधून निवडून आलेले ६२ खासदार आज शपथ घेतील. जे खासदार आज येऊ शकणार नाहीत, त्यांची अधिवेशनावेळी सभागृहात शपथ घेतली जाईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शपथविधी दरम्यान सोशल डिस्टंसिंगची काळजी घेतली जाणार आहे. तसेच, जे खासदार शपथ घेणार आहेत. ते फक्त एकाच व्यक्तीला आपल्याबरोबर या शपथविधी सोहळ्यासाठी आणू शकतील, अशा सूचना सर्व खासदारांना आधीच देण्यात आल्या आहेत.
आज शपथ घेणाऱ्या खासदारांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया, काँग्रेसचे दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील खासदार –
उदयनराजे भोसले – भाजप
भागवत कराड – भाजप
रामदास आठवले – भाजप पुरस्कृत
शरद पवार – राष्ट्रवादी
फौजिया खान – राष्ट्रवादी
राजीव सातव – काँग्रेस
प्रियांका चतुर्वेदी – शिवसेना
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.