आज (१६ जुलै) अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्याची घटना घडली. ओबामा, नेत्यान्याहूंसह जो बिडेन, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले. आणि हॅकर्सनी एक लाखांपेक्षा जास्त डॉलर्स कमावले आहेत. हे एक बिटकॉईन स्कॅम आहे.याद्वारे बराक ओबामा, जो बायडन, कान्ये वेस्ट यांच्या ऑफिशल अकाऊंट्सकडेही क्रिप्टोकरन्सीमध्ये देणगी मागण्यात आली आहे.
हॅकेर त्यांच्या अकाऊंट वरून ट्विट करत बिटकॉईनची मागणी करत आहे. या हॅक नंतर ट्वीटरनेही यासंदर्भात ट्विट करुन अनेक ट्विटर अकाउंटसंदर्भात समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. “ट्विटरवरील अकाउंटवर परिणाम झाल्याचे आम्हाला दिसून आलं आहे. आम्ही या प्रकरणात चौकशी करत असून याबद्दलची अधिक माहिती लवकरच देऊ,” असे ट्विटर सपोर्टने म्हटले आहे.
We are aware of a security incident impacting accounts on Twitter. We are investigating and taking steps to fix it. We will update everyone shortly.
— Twitter Support (@TwitterSupport) July 15, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.