HW News Marathi
देश / विदेश

CDS बिपीन रावत यांना वेलिंग्टन सैनिक रुग्णालयाबाहेर लष्करी अधिकाऱ्यांकडून मानवंदना

नवी दिल्ली | देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस बिपीन रावत यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. भारतीय वायूदलाचे M-17V5 हेलिकॉप्टर तमिळनाडूमधील कन्नरमध्ये कोसळले होते. या घटनास्थळावरून हेलिकॉप्टरचा ब्लॉक बॉक्स सापडला आहे. आणि फॉरेन्सिक पथकाने हा ब्लॉक बॉक्स ताब्यात घेतला आहे. या दुर्घटनेत बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचेही निधन झाले असून त्यांच्यावर आज (९ डिसेंबर) अंत्यसंस्कार होणार आहे.

रावत यांच्या पार्थिवावर उद्या (१० डिसेंबर) दुपारी दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहेत. रावत यांच्यासह १२ अधिकारऱ्यांचे पार्थिक दिल्लच्या दिशेने रावाना होणार आहे. रावत यांचे पार्थिव वेलिंग्टन रुग्णालयातून दिल्लीला विशेष विमानाने नेहण्यात येणार आहे. रावत यांना वेलिंग्टन सैनिक रुग्णालयाबाहेर लष्करी अधिकाऱ्याकडून मानवंदना देत आहेत.

बिपीन रावत यांचा अल्प परिचय

बिपीन रावत हे डिसेंबर २०१९मध्ये लष्करीसेवेतून निवृत्त होणार होणार होते. पण, सेवानिवृत्त होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती केली. बिपीन रावत यांना देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी विराजमान होणारे पहिले व्यक्त आहेत. रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ साली झाला होता. रावत यांचे वडील देखील एलएस रावत सैन्यात होते. रावत यांचे प्राथमिक शिक्षण शिमलामधील सेंट एवडर्ड स्कूलमधून झाले. यानंतर त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजातून पदवीचे शिक्षण घेतले असून पुढील शिक्षण अमेरिकेत घेतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची आज बैठक 

News Desk

जाणून घ्या… गुरूपौर्णिमेचे महत्व

News Desk

पाकिस्तानातील हिंदुंच्या विवाहातील अडचणी दूर होणार

News Desk