HW News Marathi
Covid-19

#RathYatra : सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर जगन्नाथ रथ यात्रेला आजपासून सुरुवात

मुंबई | देशातील शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या ओडिशातील पुरीमधील जगन्नाथ रथ यात्रेला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे. जगन्नाथत रथ यात्रेला आजपासून (२३ जून) सुरू झाली आहे. मात्र, न्यायालयाने अटी-शर्थींसह या रथ यात्रेचे आयोजन परवानगी दिली आहे. या यात्रेत मंदिर समिती राज्य सरकार आणि केंद्र सरकारसोबत समन्वय करुन आरोग्याशी कोणताही तडजोड न करता यात्रेचे आयोजन करेल, असेही निर्देश न्यायालयाने यावेळी दिले. याआधी जगन्नाथ रथ यात्रेला कोलरा आणि प्लेगच्या साथीत देखील अशाच पद्धतीने नियम आणि अटींसह मर्यादित लोकांच्या उपस्थितीत रथयात्रा आयोजित करण्यात आली होती.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर याआधी सर्वोच्च न्यायालयाने रथ यात्रेवर स्थगिती आणली होती. पण, न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखला झाल्या होत्या. या याचिकांवर काल (२२ जून) सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली. सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने ही सुनावणी केली. काही अटी-शर्थींसह ही रथयात्रा सुरु ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

केंद्राच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडत ते म्हणाले, लोकांची गर्दी न करता, कोरोनाची चाचणी करुन पुजाऱ्यांना परवानगी देत ही रथयात्रा पार पाडली जाऊ शकते. देशातील इतक्या शतकांची परंपरा थांबवली जाऊ शकत नाही. जर भगवान जगन्नाथ आज येऊ शकले नाही, तर परंपरेप्रमाणे पुढील १२ वर्ष ते येऊ शकत नाहीत असेही सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण!

News Desk

देशात गेल्या २४ तासात ६७६७ रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ, तर १४७ जणांचा मृत्यू

News Desk

“नेत्यांना आत्मपरिक्षण करण्याची गरज”, लसीकरणावर टीका करणाऱ्यांना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सुनावलं

News Desk