HW News Marathi
देश / विदेश

सलग ११व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट

मुंबई | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरत झाल्याचा फायदा भारतीय ग्राहकांना होत आहे. सलग अकराव्या दिवशी देखील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये घट कायम आहे. या काळात पेट्रोलची किंमत २.७५ तर डिझेलची किंमत १.७४ रुपयांनी कमी झाली आहे.

तर मुंबईमध्ये पेट्रोल ०.३९ पैशांनी आणि डिझेल ०.३५ पैशांनी कमी झाले आहे. यामुळे आज पेट्रेलचे दर ८५.५४ रुपये आणि डिझेलचे दर ७७.६१ रुपये असणार आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ०.४० पैशांनी कमी झाली असून किंमत ८०.०५ रुपये प्रती लिटरसाठी मोजावे लागणार आहेत. तर डिझेलची किंमत ०.३३ पैशांनी कमी झाली असून प्रती लिटरसाठी ७४.०५ रुपये मोजावे लागणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नव्या घटनापीठाची स्थापना

News Desk

खासदार नवनीत राणा याचं जात प्रमाणपत्र अवैध, मुंबई उच्च न्यायालयाने ओढले ताशेरे

News Desk

कोणी घर देता का घर !

News Desk