HW News Marathi
Covid-19

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने कोरोना वॉरियर्सचा सन्मान, जगासोबत कोणताही स्वार्थ न ठेवता उभा !

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ मे) बुद्ध पौर्णिमा निमित्ताने व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे जनतेला संबोधित केले. बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिनी कोरोना वॉरियर्सचा सन्मान केला आहे. जगभर बुद्ध जयंती साजरी करण्याचा दिवस. पंतप्रधान म्हणाले की, भगवान बुद्धांनी जगाला सेवेचा संदेश दिला आहे. बुद्ध हे फक्त नाव नाही, तर प्रत्येक मानवाच्या हृदयात धडकणारा विचार आहे. भगवान बुद्ध यांनी सांगितलेले चार मार्ग दया, करुणा, समभाव, स्वीकार भारतभूमीसाठी प्रेरणादायी आहेत. त्याग, समर्पणाची भावना म्हणजे, गौतम बुद्ध असल्याचेही मोदींनी सांगितले आहे.

कोरोनाच्या संकटाच्या काळात काही लोक २४ तास सेवा करत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या कोरोना वॉरियर्सचा सन्मान करण्यात आला आहे. जगभरातील अनेक बौद्ध नेते या कार्यक्रमास उपस्थित आहेत, ते कोरोना विषाणूविरुद्धच्या या युद्धामध्ये आपले मत मांडतील.

आज संपूर्ण जग संकटातून जात आहे. भारत या वेळी विश्वहितासाठी काम करत आहे आणि नेहमीच करत राहील, असे मोदी म्हणाले. भारत संपूर्ण जगासोबत कोणताही स्वार्थ न ठेवता उभा आहे. जे मानवतेची सेवा करतात तेच बुद्धाचे खरे अनुयायी असतात. आजच्या स्थितीत भगवान बुद्ध यांची शिकवण प्रासंगिक आहे, असा संदेश गौतम बुद्धाच्या संदेश मोदींनी जनतेला संबोधित करताना दिला. संकटाच्या वेळी सर्वांना मदत करणे हा प्रत्येकाचा धर्म आहे. सामाजिक कार्य निरंतर सेवेने केले पाहिजे, इतरांवर करुणा असणे महत्त्वाचे असते, असे मोदी म्हणाले.

मोदींच्या संंबोधिनातील महत्त्वाचे मुद्दे

 

  • भगवान गौतम बुद्धने नेहमी दिशा दिली आहे
  • कोरोनाच्या संकटाच्या काळात काही लोक २४ तास सेवा करत आहे
  • त्याग, समर्पणाची भावना म्हणजे गौतम बुद्ध
  • बुद्धहे केवळ नाव नाहीतर विचार आहे
  • जेव्हा निराजा पसरते तेव्हा बुद्धांचे विचार प्रासंगिक ठरतो
  • वेळ काळ परिस्थिती बद्दली पण बुद्धांच संदेश कायम आहे
  • अशा कठीण काळात तुम्ही तुमच्या कुटुंबाची आणि आरोग्याची काळजी घ्या, आपले संरक्षण करा, तसेच दुसऱ्यांची मदत करा
  • जेव्हा इतरांसाठी मनात करूणा असते, संवेदनशीलता असते, सेवाभाव असतो तेव्हा तुम्ही कितीही मोठे आव्हान असले तरी त्याला सामोरे जाऊ शकता
  • संकटाच्या या काळात नागरिकांचे जीवन वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत
  • भगवान बुद्धांचे एक एक वचन, एक-एक उपदेश मावतेची सेवा करण्याची आपले कर्तव्य असल्याचेच जाहीर करते
  • रुग्णालयापासून ते रस्त्यापर्यंत सर्वजण मानवतेच्या सेवेला लागले आहेत
  • बुद्धाप्रमाणे आज अनेक लोक सेवा करण्यात व्यग्र झाले आहेत.
  • हताशा आणि निराशेच्या या काळात भगवान बुद्धाची शिकवण अधिक प्रासंगिक आहे
  • आज संपूर्ण जग संकटातून जात आहे. भारत या वेळी विश्वहितासाठी काम करत आहे आणि नेहमीच करत राहील
  • या संकटाच्या काळात लोकांना मदत करण्याची वेळ आहे
  • सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी नमन करतो
  • जे मानवतेची सेवा करतात तेच बुद्धाचे खरे अनुयायी असतात
  • भारत संपूर्ण जगासोबत कोणताही स्वार्थ न ठेवता उभा आहे
  • आजच्या स्थितीत भगवान बुद्ध यांची शिकवण प्रासंगिक आहे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील बौद्ध जनतेला दिल्या बुद्ध जयंतीनिमित्त शुभेच्छा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी बुद्ध पौर्णिमेनिमित्त साधत आहेत संवाद
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माय लॉर्ड, मंदिरे उघडा हो !… ‘शिवसेने’ची मागणी 

News Desk

महाराष्ट्रासाठी पुढील ८ दिवस महत्वाचे, राजेंद्र शिंगणेंनी व्यक्त केली चिंता

News Desk

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कलम १४४ लागू; अफवा, जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई

Aprna