गुजरात | राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडतच आहेत. सध्या गुजरातमध्ये राज्यसभा निवडणूक होत असून, त्यापूर्वी राजकीय धक्के बसू लागले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने २ उमेदवार उतरवले असून, भाजपचे ३ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने संख्याबळ नसताना तिसऱ्या जागेची खेळी केली आहे आणि काही अंशी ती यशस्वी होताना दिसत आहे.
कालच (४ जून) काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर आणखी एका आमदाराने राजीनामा दिल्याने राजीनामा देणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांची संख्या आता ८ वर गेली आहे. आज (५ जून) काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. राज्यसभा निवडणूक तोंडावर असतानाच काँग्रेसच्या आठव्या आमदाराने राजीनामा दिल्याने काँग्रेस सध्या चिंतेत आहे.
One more Gujarat Congress MLA resigns ahead of Rajya Sabha polls: Assembly officials
— Press Trust of India (@PTI_News) June 5, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.