HW News Marathi
देश / विदेश

#CoronaVirus : बिहारमध्ये एकाचा मृत्यू, तर देशात ‘कोरोना’ बळींची संख्या ६ वर

मुंबई | देशात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ६ वर येऊन पोहचला आहे. मुंबई आणि बिहारमध्ये प्रत्येकी १ रुग्णांचा कोरनामुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी देशात कर्नाटक १, दिल्ली १, मुंबई २, पंजाब १ आणि बिहार १ अशी एकूण देशात कोरोनामुळे ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका बाजुला देशात कोरोनाचा संसर्ग ज्याप्रमाणे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे सध्या देशात भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजुला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२२ मार्च) देशभरात जनता कर्फ्यूचे आवाहन केले असून या जनता कर्फ्यूला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

बिहारमधील पटणाचा ३८ वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली होती. या तरुणावर बिहारच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा तरुण गेल्या काही दिवसांपूर्वी कतारमधून बिहारला आला होता, अशी माहिती बिहारच्या एम्स रुग्णालयाचे डॉ. प्रभात कुमार यांनी एएनआयला दिली आहे. या माहितीनुसार या तरुणाची किडनी फेलमुळे काल (२१ मार्च) त्यांचा मृत्यू झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आज ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या ज्येष्ठ नागरिकाला १९ मार्चमध्ये मुंबईतील एका एच. एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू होते. हा रुग्ण पंधरा दिवसांपुर्वी सुरतमधून आला होता. यापूर्वी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात १७ मार्च रोजी ६४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाच दिवसांनी मुंबईतच दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ७४ वर गेली तर २ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात अशी आहे कोरोनाग्रस्तांची संख्या

  • पुणे – २७
  • मुंबई – २५
  • नागपूर- ४
  • यवतमाळ – ४
  • नवी मुंबई – ३
  • कल्याण – ४
  • अहमदनगर – २
  • रायगड – १
  • ठाणे – १
  • उल्हासनगर – १
  • औरंगाबाद – १
  • रत्नागिरी – १

एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या – ७४

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू – ११ मार्च
  • दिल्ली – ६९ वर्षीय महिलेचा मृत्यू – १३ मार्च
  • मुंबई – ६४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू – १७ मार्च
  • पंजाब – ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू – १९ मार्च
  • मुंबई – ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू – २२ मार्च
  • बिहार – ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू – २१ मार्च

एकूण – ६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रासह तीन राज्यात नीट परिक्षेचा गोंधळ

News Desk

भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तान धास्तावला !

News Desk

काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी रचला पंतप्रधानांना जीवे मारण्याचा कट; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप

Aprna