जयपूर | देशात अनेक ठिकाणी ऑपरेशन लोटस सुरू होते. मध्य प्रदेशात भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी ठरल्यानंतर आता राजस्थानमध्येही काही हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी केंद्रीय नेतृत्त्वाकडून सतिश पुनिया आणि राजेंद्र राठोड यांच्यावर विशेष जबाबादारी सोपविण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांकडून काँग्रेसच्या अनेक आमदारांना पक्ष सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला.
आज पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, सध्या आपल्याला कोरोनाविरुद्धच्या लढाईवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मात्र, भाजप सध्या राजस्थानमधील सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपचे सतिश पुनिया आणि राजेंद्र राठोड हे केंद्रीय नेतृत्त्वाच्या सांगण्यावरून वेगवेगळे डाव टाकत आहेत.
त्यांच्याकडून अनेक आमदारांना पैशाचे आमिष दाखवण्यात आले आहे. सुरुवातीला १० कोटी आणि सरकार पडल्यानंतर १५ कोटी रुपये दिले जातील, असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात आल्याचा आरोप अशोक गेहलोत यांनी केला.
#Correction Whether it is Satish Poonia or Rajendra* Rathore, they're playing games to topple our govt on behest of their central leadership. They're offering Rs 10 cr in advance & Rs 15 cr after govt is toppled…these are the kind of promises they are making: Ashok Gehlot pic.twitter.com/8F5qnFKWwy
— ANI (@ANI) July 11, 2020
मात्र, गेहलोत यांच्या या आरोपाला भाजप नेते सतीश पूनिया यांनी विरोध केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, गेहलोत राजकारण करत आहेत. त्यानी भाजपवर लावलेले हे आरोप खोटे आहेत, असे पुनिया म्हणाले आहेत.
Rajasthan Chief Minister Ashok Gehlot is a cunning politician, he is trying to blame BJP for his failure in governance. The allegations are completely baseless. He has the numbers, who will try to destabilise the government: Rajasthan BJP President Satish Punia https://t.co/iFxgflQwid pic.twitter.com/M5iw2ibOTc
— ANI (@ANI) July 11, 2020
भाजप देशाला काँग्रेसमुक्त करण्याची भाषा करत होता. मात्र, आता भाजपलाच काँग्रेसची भीती वाटू लागली आहे. राजस्थानमधील सरकार स्थिर असून ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. सध्या आम्ही पुढील निवडणूक जिंकण्याची तयारी करत आहोत, असे गेहलोत यांनी म्हटले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.