नवी दिल्ली | ‘मोदी सरकार २.०’च्या पहिल्या अधिवेशनाला सोमवारपासून (१७ जून) सुरुवात झाली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना आवाहन केले आहे. “विरोधकांनी संख्याबळाची चिंता करू नये, विरोधकांचा शब्द हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे सभागृह चालविण्यासाठी त्यांनी सभागृहाच्या कामकाजात सहभागी व्हावे. आपण नव्या उत्साहाने एकत्रितपणे काम करू”, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
Prime Minister Narendra Modi arrives at the Parliament for 17th Lok Sabha, says, "Every word of the Opposition is important." pic.twitter.com/TxTVzQkOF2
— ANI (@ANI) June 17, 2019
“अनेक अडचणींवर मात करत जनतेने पुन्हा एकदा भाजपला बहुमताने सत्तेत आणले आहे. लोकांनी आम्हाला देशाची सेवा करण्याची आणखी एक संधी दिली त्याबद्दल आहे. आजपासून लोकांच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. “लोकशाहीत विरोधकांचा शब्द अत्यंत महत्त्वाचा असतो. विरोधकांनी संख्याबळाची चिंता करू नये, विरोधकांचा शब्द हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे”, असे मोदी म्हणाले. त्याचप्रमाणे देशातील जनतेच्या हितासाठी घेण्यात येणाऱ्या निर्णयांना पाठिंबा देण्याचे आवाहन देखील मोदींनी यावेळी केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.