HW News Marathi
देश / विदेश

अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींच्या कार्यक्रमादरम्यान दहशतवादी हल्ला

काबूल | अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पीडी १३ मध्ये अब्दुल अली मजारी यांच्या २४ व्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित आलेल्या एका कार्यक्रमात दहशतवाद्यांनी गोळीबार केला असल्याची माहिती मिळाली आहे. या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या कार्यक्रमासाठी अफगाणिस्तामध्ये राष्ट्रपती हामिद करजई यांच्यासमवेत अनेक नेते आणि अधिकारी उपस्थित होते. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारीत राष्ट्रपती पदाचे उमेदवार अब्दुल लतीफ पेड्रम जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याबरोबरच माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार हनीफ अत्तार यांचे आठ बॉडीगार्ड सुद्धा जखमी झाले आहेत.

घटनास्थळी सुरक्षा दलाचे जवान दाखल झाले असून परिसर खाली करण्यात येत आहे. याशिवाय जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच, या हल्ल्यात जवळपास तिघांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे”, मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना टोला  

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये दरीत बस कोसळून ३३ जणांचा मृत्यू, २२ जखमी

News Desk

चंदा कोचर यांच्याविरोधात सीबीआयचे लूकआऊट नोटीस जारी

News Desk