HW News Marathi
देश / विदेश

बेस्ट टॉयलेट पेपर सर्च करताच पाकिस्तानचा झेंडा, गुगल म्हणते आमचा दोष नाही

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात भारतीय जवानांवरील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानला लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्यानंतर पाकिस्तानवर सर्वच देशांकडून मोठ्या प्रमाणावर दबाव आणला जात आहे. त्यातच या हल्ल्यानंतर ‘बेस्ट टॉयलेट पेपर इन द वर्ल्ड’ असे सर्च करताच पाकिस्तानचा झेंडा दिसत असल्याने पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली. या संपूर्ण प्रकारावर पाकिस्तानने तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर आता गुगलने मात्र याबाबतची जबाबदारी झटकली आहे.

गुगलकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असून या संपूर्ण प्रकारात आमचा दोष नसल्याचे गुगलने स्पष्ट केले आहे. खरंतर कोणत्याही फोटोच्या कि-वर्डनुसार तो फोटो गुगल सर्चमध्ये दिसणार कि नाही हे ठरते. तसेच तो शब्द अनेकदा वापरात आलेला असावा लागतो. दरम्यान, याआधीही असे अनेक प्रकार घडले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला संपूर्ण जगाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, गुगल सर्च प्रकरणी अद्याप चौकशी सुरु आहे. या चौकशीनंतर यामागचे नेमके सत्य बाहेर येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डोवाल यांनी काश्मीरमधील नागरिकांसोबत जेवण करत केली चर्चा

News Desk

राहुल गांधींना मौजमजेसाठी काश्मीरला जायचे असेल तर आम्ही व्यवस्था करतो !

News Desk

Breaking News : चंदा कोचर यांचा बँकेच्या सीईओ पदाचा राजीनामा

swarit